मानधनवाढीसह शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा लागु करण्यासाठी अंगणवाडी कर्मचार्‍यांचे जिल्हा परिषदांवर मोर्चे

0

धुळे | प्रतिनिधी : राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत सुमारे २ लाख अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांचे मानधन वाढविण्याचे आश्‍वासन शासनाने दिले आहे.

पंरतू त्यानुसा मानधनात वाढ करण्यात आलेली नाही. यात वाढ करण्यासह शासकीय कर्मचार्‍याचा दर्जा मिळावा यासाठी आज राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदांवर मोर्चे काढलेत.

धुळे येथील जिल्हा परिषदेवर आज मोर्चा काढण्यात आला. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील, युवराज बैसाणे,सुषमा माळी, संगिता जाधव, निर्मला पाटील, सुमन मराठे, क्रांती खैरणार, लता पवार, लिया तवर, सुरेखा बोरसे, उषा पिंपळे, नंदा बिरारीस, भारती खैरणार, रत्ना पगारे, शकुंतला पाटील आदी उपस्थित होते.

तर ४ ऑगस्टला मुंबईला महामोर्चा

मागण्या मान्य न केल्यास ४ ऑगस्ट रोजी मुंबईला महामोर्चा काढण्याचा व सप्टेंबरपासून अंगणवाडी बंद करून संपावर जाण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

या आहेत मागण्या

अंगणवाडी कर्मचार्‍यांना शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा लागु करत त्यांना मिळणार्‍या सेवा समाप्ती लाभांत सुधारणा करणे.

अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना भविष्य निर्वाह भत्ता लागु करावा.

आजारपणाची रजा व भरपगारी उन्हाळी सुटी सुरू करावी.

मिनी अंगणवाडीचे नियमित अंगणवाडीत रूपांतर करावे.

नागरी भागातील अंगणवाडींना सुधारीत घरभाडे भत्ता लागु करावा.

LEAVE A REPLY

*