धुळ्यातील वादग्रस्त कुणाल बिअर बारवर मनपाचा हतोडा

0
धुळे | प्रतिनिधी : धुळे शहरातील नकाणे रोडलगत असलेला प्रमोदनगर भागातील वादग्रस्त कुणाल बिअर बार महापालिकेतर्फे आज पहाटे उदध्वस्त करण्यात आला.
पोलिस बंदोबस्तात कारवाई
सकाळीच महापलिकेचे जेसीबी, ट्रॅक्टर व कर्मचारी आणि पोलिस बंदोबस्त असा ताफा कुणाल बिअर बारजवळ उपस्थित होत कारवाई करण्यात आली. जेसीबीने बार जमीनदोस्त करण्यात आला.

गेल्या अनेक दिवसांपासून नागरीकांचे आंदोलन सुरू होते. सदर बारची तक्रार स्थानिक नगरसेवक कमलेश देवरे, नगरसेविका दुसाणे व वॉर्डातील महिला, नागरिक यांनी केली होती. त्यांच्या लढ्याला अखेर यश आले आहे.

LEAVE A REPLY

*