वनहक्क दावा प्रमाणपत्र वाटप

0
पिंपळनेर । दि.17 । वार्ताहर-कन्हैयालाल बहुउद्देशीय संस्थेच्या पुढाकारामुळे 10 गावांना 3155 हेक्टर वनपट्ट्याचे वाटप करण्यात आल्याने आता गावात ‘आपले सरकार’ निर्माण होणार आहे.
यातुन विकास करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी सामुहिक वनहक्क दावा प्रमाणपत्र वाटपप्रसंगी बोलतांना म्हणाले.
देवगिरी कल्याण आश्रम, देवगिरी प्रांत यांच्या प्रेरणेने व श्री.कन्हैयालाल बहुउद्देशिय संस्था रोहोड यांच्या प्रयत्नातून एकूण 10 गावांची सामुहिक वनहक्क दावे प्रमाणपत्राचे वाटप कालदर ता.साक्री येथे जिल्हाधिकारी यांच्याहस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी अध्यक्षस्थानी वन व पर्यावरण मंत्रालयाचे सदस्य चैत्राम पवार, प्रमुख पाहुणे अखिल भारतीय हित रक्षा प्रमुख गिरीष कुबेर, आ.डी.एस.अहिरे, डी.एस.एफ. अनारसे, माजी डीसीएफ राजेंद्र धोंडगे, प्रांताधिकारी गणेश मिसाळ, तहसीलदार वाय.सी. सूर्यवंशी, डीएफओ कुलकर्णी, कन्हैयालाल बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष डॉ.मनिष सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते विजय पवार, सरपंच चित्राबाई गांगुर्डे, माजी सरपंच युवराज चौरे यासह परिसरातील 15 गावांच्या वनसमित्या व ग्रामस्थ उपस्थित होते.

शहरात सामुहिक वनहक्क वाटपाची ही पहिली घटना असल्याने, यात शासनाने उत्तम प्रकारे भुमिका मांडली असल्याने 10 गावांना वनपट्याचे वाटप करण्यात आले आहे. गावाने त्यातून विकास साधण्यास मदत होणार आहे. वनविभागाच्या मालकीची जमिन आता गावांना मिळाली असल्याने त्यातून विकास साधला जाईल यासाठी कन्हैयालाल बहुउद्देशिय संस्थेने पाठपुरावा करुन अधिकार गावाला प्राप्त करुन दिला आहेे.

सामुहिक वनहक्क दावा प्रमाणपत्राचे वाटप पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यात कालदर, शेवगे, मंडाणे, बारीपाडा, मापलगाव, मांजरी, चावडीपाडा, मोहगाव, पिंपळगाव खुर्दे, दरेगाव यासर्व गावांना 3155 हेक्टर वनपट्याचे वाटप करण्यात आले. यावेळी आ.डी.एस. अहिरे यांनी सदर गावांची आता जबाबदारी वाढली असून गावाने त्यातून विकास करावा व डॉ.मनिष सूर्यवंशी यांचे कौतुक केले. यावेळी डीसीएफ अनारसे म्हणाले की, आमचे काम हलक झाल असल तरी गावाचे काम वाढले आहे. यासाठी संपूर्ण मदत गावाला केली जाईल. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष चैत्राम पवार यांनी वनपट्या ताब्यात घेत्यानंतर सर्व ग्रामस्थांनी वेळोवेळी एकत्र येवून गावाचा कसा विकास होईल याचे प्रयत्न करावा व कन्हैयालाल संस्थेचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.मनिष सूर्यवंशी यांनी केले तर आभार विजय पवार यांनी मानले.

 

LEAVE A REPLY

*