थकबाकीदार शेतकर्‍यांनी कर्ज मंजुरीचा लाभ घ्यावा! – कदमबांडे

0
धुळे । दि.17 । प्रतिनिधी-शासन निर्णयानुसार खरीप हंगामासाठी दहा हजाराचे कर्ज देण्यात येणार आहे. 30 जून 2016 पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकर्‍यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांनी केले आहे.
राज्य शासनाने खरीप हंगामासाठी 30 जून 2016 च्या अखेरच्या थकबाकीदार शेतकर्‍यांना दहा हजारपर्यंत शासन हमीवर बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत निर्णय दिला आहे.
त्यानुसार कर्जासाठी अर्ज करणारे थकबाकीदार शेतकर्‍यांनी शासन निर्णयामधील अ.क्र.6 मध्ये नमुद केलेल्या वर्गवारीत मोडत नाहीत.

याबाबतीत बँकांशी संलग्न प्राथमिक वि.का. व आदी. वि.का.सह.संस्थांकडून बँकेने पुरविलेल्या स्वयंघोषित शपथपत्र आपण कर्ज घेत असलेल्या संस्थाच्या सचिवाकडे आपली सही करुन जमा करावे, वैयक्तिक बँक कर्ज घेणार्‍या सभासदांसाठी शपथपत्र बँक तपासणीस यांच्याकडे संबंधित शाखेत उपलब्ध आहेत.

त्यांच्याकडून शपथपत्र घेवून सहीनिशी शाखेत तपासणीस यांच्याकडे जमा करावेत. शपथपत्र जमा केल्यानंतर संबंधित शेतकर्‍यांना दहा हजार रुपये कर्ज मंजूर करण्यात येईल.

तरी शासन निर्णयाचा लाभ 30 जून 2016 रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकरी सभासदांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कदमबांडे यांनी केले आहे.

10 हजार रुपयांच्या कर्जासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
खरीप हंगाम 2017- 2018 यासाठी थकीत कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या (30 जून 2016 रोजी थकबाकीदार असलेल्या) शेतकर्‍यांना निविष्ठा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने रुपये 10 हजारच्या मर्यादेपर्यंत शासन हमीवर तातडीने कर्ज देणेबाबत जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., व्यापारी, राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँका यांना तातडीने कर्ज देणेबाबत शासन निर्णयानुसार आदेशित केले आहे. या शासन निर्णयाची मुदत 15 जुलै 2017 पर्यंत होती. त्या अनुषंगाने शासन निर्णय 14 जुलै 2017 नुसार या कर्ज वाटपाची मुदत 31 ऑगस्ट 2017 पर्यंत करण्यात आलेली आहे. पात्र शेतकरी बांधवांनी संबंधित बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जे. के. ठाकूर, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, धुळे यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

*