मैत्रेय गुंतवणुकदारांचा मोर्चा

0
धुळे । दि.17 । प्रतिनिधी-मैत्रेय उद्योगचे पिडीत ग्राहक आणि प्रतिनिधी यांना गेल्या 18 महिन्यांपासून कंपनीकडून कुठलाही परतावा मिळत नाही.
यापुर्वीही यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. मात्र कंपनी किंवा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे आश्वासन मिळालेले नाही.
त्यामुळे मैत्रेय उपभोक्ता एवम अभिकर्ता असोसिएशनतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येऊन प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
मोर्चाला सकाळी 11 वाजता पांझरा चौपाटीपासून सुरूवात झाली. वीर सावरकर पुतळा, छोटा पुल, महाराणा प्रताप पुतळा, झाशीची राणी पुतळा, जिजामाता हायस्कुल मार्गे मोचर्ज्ञा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला.

तेथे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. असोसिएशनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरील लाखो ग्राहक मैत्रेयकडून त्यांचा हक्काचा परतावा परत मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

त्याबाबत प्रशासन स्थरावर आजपर्यंत काय कार्यवाही केलेली आहे किंवा काय कारवाई करणार आहेत, याबद्दल सविस्तर माहिती मिळावी.

5 फेब्रुवारी 2015 पासून कंपनी बंद असून ग्राहकांचे पेमेंट, परतावा दिले गेलेले नाहीत तरी कंपनीचा सर्व डाटा, माहिती, सर्व्हर हा सरकारवाडा पोलीस स्टेशन नाशिक यांच्याकडे जमा आहे.

त्यातील माहितीनुसार ग्राहकांचा पूर्ण झालेल्या मुदतीच्या तारखेनुसार परतावा, पेमेंट लवकरात लवकर करण्यात यावे. यासाठी किती कालावधी लागेल व ग्राहकांचा परतावा कसा दिला जाईल याचा प्रशासनाने आराखडा जाहीर करावा, सरकारवाडा पोलीस स्टेशन नाशिक, गुन्हे अन्वेशन शाखा मुंबई, सेबी मुंबई यांनी मैत्रेयच्या बर्‍याच मालमत्ता जप्त केलेल्या आहेत.

परंतु अद्याप पावेतो त्या प्रॉपर्टी विकण्यासंदर्भात काहीही कारवाही केल्याचे दिसून येत नाही. त्याबद्दल निर्णय घेणे आवश्यक आहे.

प्रशासनाने कंपनीच्या अघोषीत मालमत्तेचा शोध घ्यावा. कंपनी यांनी मालमत्ता जाहीर रित्या विक्री करुन ग्राहकांचा परतावा त्वरित द्यावा, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

 

LEAVE A REPLY

*