छत्तीसगडच्या कृषीमंत्र्यांनी केली ‘शिरपूर पॅटर्न’ची पाहणी

0

शिरपूर / छत्तीसगड राज्याचे कृषि, पशु वैद्यकिय, जलसंवर्धन व अनेक खाते सांभाळणारे मंत्री ब्रिजमोहन अग्रवाल यांनी शिरपूर पॅटर्नसह विविध विकास कामांची पाहणी केली.

माजी शिक्षणमंत्री आ. अमरिशभाई पटेल व वरीष्ठ भूजलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर यांनी केलेल्या आदर्शवत अशा शिरपूर पॅटर्नच्या जलसंधारणाच्या विविध कामांची तसेच शहरासह तालुक्यातील विविध विकास कामांची पाहणी करुन मंत्री ब्रिजमोहन अग्रवाल यांनी सविस्तरपणे समजून घेतले. ही सर्व कामे पाहून त्यांनी खूपच आनंद व्यक्त केला.

शिरपूर येथे एका कार्यक्रमानिमित्त मंत्री ब्रिजमोहन अग्रवाल हे आले होते. माजी शिक्षमंत्री आ. अमरिशभाई पटेल, आ. काशिराम पावरा, प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांनी त्यांचे स्वागत केले.

मंत्री ब्रिजमोहन अग्रवाल यांनी शिरपूर पॅटर्न अंतर्गत जलसंधारणाची विविध कामे, शहरातील व तालुक्यातील विविध विकास कामांची पाहणी करुन आनंद व्यक्त केला.

LEAVE A REPLY

*