प्रलंबित शिष्यवृत्ती प्रस्ताव निकाली काढा

0
धुळे । दि.17 । प्रतिनिधी-जिल्ह्यातील महाविद्यालयस्तरावरील मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती विषयक अर्ज मोठ्या संख्येने प्रलंबित आहेत, हे अर्ज निकाली काढण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांना आवश्यक कागदपत्रांची तात्काळ पूर्तता करुन संबंधित महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीच्या संकेतस्थळावर त्यांची पूर्तता करुन प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त के.बी.बागूल यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

धुळे जिल्ह्यातील महाविद्यालयस्तरावरील शिष्यवृत्ती विषयक एकूण 7 हजार 800 अर्ज प्रलंबित आहेत. या प्रलंबित अर्जांबाबत जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना वेळोवेळी सूचनाही निर्गमित करण्यात आल्या आहेत.

मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व महाविद्यालयातील प्राचार्यांनी संबंधित विद्यार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन ऑनलाईन संगणक पोर्टल व्दारे त्याची तत्काळ पूर्तता करावी व प्रलंबित असलेले सर्व प्रस्ताव निकाली काढण्यात यावे, असेही त्यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

 

LEAVE A REPLY

*