स्वयंरोजगारातून स्वंयपूर्ण व्हा – सुधाकर देशमुख

0
धुळे । दि.15 । प्रतिनिधी-पहिल्या जागतिक युवा कौशल्य विकास दिनी कौशल्य विकास आणि उपक्रमशिलता मंत्रालयाने स्किल इंडिया मोहिमेचा प्रारंभ केला असून युवकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी कौशल्य विकास दिन साजरा केला जातो.
प्रत्येक युवक, युवतीने नोकरी करण्यापेक्षा कौशल्य विकसित करुन स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन महानगर पालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी आज केले.
जागतिक युवा कौशल्य विकास दिनानिमीत्त जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उद्योजक असोसिएशनचे अध्यक्ष नितीन बंग, उद्योजक भरत अग्रवाल यांच्यासह कनिष्ठ कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी सौ.मांडगे, व्ही.टी.पी. संस्थेचे दीपक गुरव, चंद्रकला शिसोदिया, रवी पाटील, रत्ना मिस्तरी, मोहिनी जाधव आदी उपस्थित होते.

आयुक्त श्री.देशमुख म्हणाले, प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेअतंर्गत राज्यात कौशल्य विकसित करण्याचे प्रयत्न व्यापक स्तरावर सुरू आहेत.

उद्योजकांना कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते तेंव्हा युवकांनी स्वयंरोजगाराच्या संधी शोधून अचूक कौशल्य प्राप्त करुन यशस्वी उद्योजक होण्याचे ध्येय बाळगावे असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी श्री.बंग, श्री.अग्रवाल यांनी युवकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी चद्रज्योती मांडगे यांनी केले, सुत्रसंचलन सी.पी.चौधरी यांनी केले. सकाळी सर्वप्रथम कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रापासून जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यात सर्व व्ही.टी.पी. व प्रशिक्षणार्थी तसेच एम.सी.व्ही.सी. चे महाविद्यालयीन विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग रॅलीत सहभागी झाले होते.

 

 

LEAVE A REPLY

*