एकाच ठिकाणी वारंवार होणार्‍या अपघात स्थळांचे सर्वेक्षण करणार

0

धुळे / रस्त्यावरील एकाच ठिकाणी वारंवार होणार्‍या अपघातस्थळांचा ब्लॅक स्पॉट म्हणून सर्वेक्षण करण्यात येवून त्यावर उपाययोजना करण्यात येणार आहेत, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी, धुळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

परिवहन अधिकारी, धुळे यांनी म्हटले आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीच्या निर्देशानुसार रस्ते अपघातातील मृतांच्या संख्येवर नियंत्रण प्राप्त निर्देशानुसार जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक झाली.

जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत रस्त्यावरील होणार्‍या अपघाती मृत पावणार्‍या संख्येच्या 10 टक्के कमी अपघात होतील यासाठी उपाययोजना सूचविण्यात येवून त्यास मान्यता दिलेली आहे.

निर्णयाचे संक्षिप्त स्वरुप पुढील प्रमाणे : रस्त्यावरील एकाच ठिकाणी वारंवार होणार्‍या अपघात स्थळांच्या ब्लॅक स्पॉट म्हणून सर्वेक्षण करण्यात येवून त्यावर उपाययोजना करण्यात येतील. सार्वजनिक बांधकाम विभाग हे काम करणार आहे.

 

LEAVE A REPLY

*