दराणेच्या घरकुल योजनेत अपहार; ग्राम रोजगार सेवकाला अटक

0
धुळे । दि.15 । प्रतिनिधी-लाभार्थ्यांच्या नावे व बँक खाते व्हाईटनरने खोडून स्वत:चे व इतरांचे नावे व खाते क्रमांक टाकून बनावट वितरण पत्र तयार करुन त्याद्वारे त्यांच्या खात्यात सदर धनादेशाची रक्कम वटवून तीन लाख 85 हजारांचा अपहार केल्या प्रकरणी ग्रामरोजगार सेवकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी ग्राम रोजगार सेवकाला शिंदखेडा पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, सन 2014-15 या आर्थिक वर्षात पंचायत समिती शिंदखेडा अंतर्गत इंदिरा आवास योजनामध्ये ग्रामपंचायत दराणे येथे राहणार्‍या लिलाबाई नागराज पाटीलसह 19 जणांना शिंदखेडा पंचायत समितीकडून मंजूर झालेल्या घरकुलाचे हप्ते वितरण करण्यासाठी स्टेट बँक, दोंडाईचा, बँक ऑप इंडिया चिमठाणा शाखा या बँकांच्या नावाने दिलेल्या वितरण पत्रातील सदर लाभार्थ्यांचे नावे व बँक खाते क्रमांक व्हाईटनरने खोडून ग्राम रोजगार सेवक बाबुलाल गोविंदा पवार याने स्वत:चे व इतरांचे नावे व खाते क्रमांक टाकून बनावट वितरण पत्र तयार करुन त्या आधारे सदर धनादेशाची रक्कम वटवून तीन लाख 85 हजारांचा अपहार करुन शासनाची फसवणूक केली. अशी फिर्याद विस्तार अधिकारी भिमराव बाबुराव गरुड यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात दिली. भादंवि 465, 468, 469, 470, 471, 406, 420 प्रमाणे ग्राम रोजगार सेवक बाबुलाल गोविंदा पवार विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

तरुणाला मारहाण- मोटार सायकलीची हुलकावणी दिल्याचा राग येवून धनसिंग भटेसिंग राजपूत रा. बोरगाव याने चंदू हिरालाल पाटील यांच्याशी वाद घातला. त्यांना हाताबुक्क्यांनी मारहाण करुन हात फॅक्चर केला तसेच ठार मारण्याची धमकी दिली अशी फिर्याद पाटील यांनी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात दिली. भादंवि 325, 323, 504, 506 प्रमाणे धनसिंग भटेसिंग राजपूत विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाईल चोरी- शहरातील सुयोग नगरात राहणारे चंद्रकांत अशोक गाडगे यांची ट्रक शासकीय दूधडेअरी रोडवर उभी होती. अज्ञात चोरट्याने ट्रकच्या उघड्या कॅबिनमधुन दहा हजाराचा मोबाईल चोरुन नेला अशी फिर्याद चंद्रकांत गाडगे यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली. भादंवि 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
28 हजारांची चोरी- शहरातील मिल्लत नगरात राहणारे सलिम उर्फ लंबू शेख कालू हे दि. 14 जुलै रोजी सायंकाळी 4.15 वाजता श्री शाहू महाराज नाट्यगृह येथे असतांना अज्ञात चोरट्याने त्यांचे 28 हजार रुपये चोरुन घेतले अशी फिर्याद आझादनगर पोलिस ठाण्यात सलिम शेख यांनी दिली. भांदवि 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

तरुणाला मारहाण- शहरातील पंचवटीत राहणारे नागेश राकेश निकम यांना दि. 13 जुलै रोजी रात्री 11.30 वाजता शशिकलाबाई भगवान मोरे यांच्या मालकीचा कुत्रा चावला. याबाबत शशिकलाबाई मोरे यांना नागेश निकमने सांगितल्याचा राग येवून नागेश यांना शशिकलाबाईसह चार जणांनी हाताबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली अशी फिर्याद नागेश राकेश निकम यांनी देवपूर पोलिस ठाण्यात दिली. भादंवि 323, 504, 506, 34 प्रमाणे शशिकलाबाई भगवान मोरे, पोलिस शिपाई अनिता भगवान मोरे, दीपक भगवान मोरे, गिताबाई भगवान मोरे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

विष घेवून आत्महत्या- गोताण, ता. धुळे येथे राहणारा उमाजी अंबर पाटील (वय60) याने दि. 14 जुलै रोजी दुपारी 303 वाजता स्वत:च्या शेतात काहीतरी विषारी औषध घेतले. त्याला भटू उमाजी पाटील यांनी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉ. प्रिया म्हसके यांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत पोकॉ जी.एस.पवार यांनी तालुका पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

 

LEAVE A REPLY

*