विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या वीज तंत्रज्ञाच्या पत्नीला नोकरी द्या- मागणी

0
पिंपळनेर । वार्ताहर-मळगाव येथे वीज तंत्रज्ञ संजय बकाराम भोये यास विद्युत पोलवर दुरुस्ती करतांना अचानक विद्युतपुरवठा सुरु झाल्याने शॉक लागून जागेवर मृत्यू झाला. या घटनेची सखोल चौकशी होवून मयताच्या कुटुंबाला आर्थिक मदत देवून मयताच्या पत्नीस नोकरीत (सेवेत) सामावून घेण्यात यावे, अशी मागणी आदिवासी कोकणी समाज मंडळातर्फे पिंपळनेर विज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता देवेद्र पवार यांचेकडे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, संजय बकाराम भोये (रा.कुंत्तरखांब) ही कुडाशी फीडर (सबस्टेशन कार्यक्षेत्रात) कामावर होते. ते मळगाव शिवारात खांबावर चढून काम करीत असतांना अचानक विद्युत पुरवठा सुरु झाल्याने त्याला कमरेला शॉक लागला.तो खांबावरुन खाली कोसळताच जागीच मृत्यू पावला.

या घटनेची आपल्या खात्यामार्फत सखोल चौकशी करुन दोषी व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी व मयताच्या कुटुंबास विज वितरण कंपनीकडून अर्थसहाय्य मिळवून द्यावे व मयताच्या पत्नीस सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी आदिवासी कोकणी संघटनेने लेखी निवेदन देवून केले आहे.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अभियंता श्री. पाटील यांनी निवेदन स्वीकारुन चौकशी करु व अर्थसहाय्य मिळवून द्यावे व मयताच्या पत्नीस सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी आदिवासी कोकणी संघटनेने लेखी निवेदन देवून केली आहे.भोय यांच्या कुटूंबावर मोठे संकट कोसळले असून परिस्थितीची जाणीव ठेवून तत्काळ मदत करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अभियंता श्री.पाटील यांनी निवेदन स्वीकारुन चौकशी करु व अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी आपले निवेदन वरीष्ठांकडे पाठवतो असे सांगितले.

निवेदन देतांना संघटनेचे माजी खा. बापू चोैरे, अध्यक्ष डॉ. रंजन गावीत, सचिव हेमंत अहिरे, तुकाराम बहिरम, मांगीलाल गांगुर्डे, जि.प.सदस्य योगेश चौधरी, जि.प.सदस्य शिवाजी भोये, एस.आर.बागुल, सचिन राऊद, युवराज बागुल, यशवंत भोये, मन्साराम भोये, तुळशिराम महाले आदी यावेळी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*