कासारे सरपंच अपात्र

0
धुळे । दि.14 । प्रतिनिधी-सरपंच पदाचा गैरवापर व शासनाच्या निधीचा दूरुपयोग केल्याप्रकरणी विभागीय आयुक्त नासिक यांच्या आदेशान्वय साक्री तालुक्यातील कासारे येथील सरपंच श्रीमती माहेश्वरी देसले यांना पदावरुन अपात्र ठरविण्यात आले.
कासारे सरपंच माहेश्वरी सचिन देसले यांनी सरपंच पदाचा दुरुपयोग करुन शासनाच्या 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून गटारींचे बांधकाम व ग्राम पंचायत निधीतून गाळे बांधकामासाठी 15 खाजगी व्यक्तींकडून 76 लाख 70 हजार रुपये जमा केले होते.

तसेच ही रक्कम सरपंच माहेश्वरी देसले यांनी व्यक्तीगत कामासाठी परस्पर खर्च केली. त्यानुसार त्यांना मुंबई ग्रामपंचायत अधिनियमांतर्गत कारण दाखवा नोटीस देण्यात आली होती.

परंतू त्यांनी खुलासा केला नाही. त्यानुसार सरपंच देसले यांनी पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 (1) नुसार सरपंच पदापासून अपात्र ठरविण्यात आले आहे. विभागीय आयुक्तांनी हा निकाल दिला.

 

LEAVE A REPLY

*