‘कर्जे पे चर्चा’ आंदोलनाला शेतकर्‍यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

0
शिंदखेडा । दि.14 । प्रतिनिधी-राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेच्या शासन निर्णयामध्ये मोठ्या प्रमाणावर जाचक अटी घालण्यात आल्या आहेत.
या अटींच्या विरोधात काँग्रेस पक्षातर्फे कर्जे पे चर्चा अभियानांतर्गत माझी कर्जमाफी झाली नाही, अशा आशयाचे शेतकर्‍यांकडून अर्ज भरण्याचा प्रारंभ आज सकाळी आठ वाजता धमाणे व कुरकवाडे, ता.शिंदखेडा येथून करण्यात आला.
शिंदखेडा काँग्रेस तालुक्यातर्फे राज्य शासनाच्या कर्जमाफीच्या धोरणाच्या विरोधात त्या-त्या शेतकर्‍यांना कर्ज माफीचा लाभ होणार नाही.
अथवा ज्यांच्यावर अन्याय होणार आहे अशा शेतकर्‍यांकडून माझी कर्ज माफी झाली नाही, असे अर्ज भरण्याचा शुभारंभ आज सकाळी करण्यात आला.

शिंदखेडा तालुक्यातील धमाणे व कुरकवाडे येथे डाी.हेमंतराव देशमुख, शामकांत सनेर, ज्ञानेश्वर भामरे, तालुकाध्यक्ष रावसाहेब पवार, भानुदास पाटील, शामकांत पाटील, बापू महाजन, पांडुरंग माळी, जिजाबराव पाटील, महेंद्र निकम, डॉ.रवींद्र देशमुख, आबा मुंडे, नरेंद्र पाटील, किशोर पाटील, जितेंद्र गिरासे, भोजेसिंग राजपूत आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ.हेमंतराव देशमुख म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाने निवडणुकीच्या वेळी जे आश्वासने दिलेली आहेत ते पूर्ण करण्यास सरकार असमर्थ ठरत आहे.

या उलट सरकार निवडणुकांमध्ये दिलेले आश्वासन म्हणजे चुनावी जुमला असल्याचे सांगत आहे. त्यामुळे जनतेने या सरकारकडून कुठलीही अपेक्षा करु नये. शासनाच्या जाचक अटी रद्द करुन सरसकट कर्जमाफी व्हावी, यासाठी गावोगावच्या शेतकर्‍यांनी अर्ज भरुन द्यावेत, असे आवाहन केले आहे.

जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शाम सनेर म्हणाले की, कर्जमाफी योजनेतील जाचक निकष लावून शेतकर्‍यांना कमीत कमी लाभ मिळावा हा सरकारचा हेतू दिसत आहे.

सरसकट कर्जमाफी व्हावी, सरकारची कर्जमाफीची रक्कम शेतकर्‍याच्या खात्यावर जमा करावी तसेच नियमीत कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांनाही सरसकट कर्जमाफी व्हावी यासाठी तालुक्यातील शेतकर्‍यांनी अर्ज भरुन देण्याचे आवाहन केले आहे.

यावेळी ज्ञानेश्वर भामरे, बापू महाजन, रावसाहेब पवार, जिजाबराव पाटील, भानुदास पाटील, सुरेश पाटील, शामकांत पाटील, पांडुरंग माळी, जुल्लक सोनवणे यांनी शेतकरीविरोधी सरकारच्या धोरणाचा निषेध केला.

आज सकाळी धमाणे व कुरकवाडे येथील कर्जमाफी योजनेत न बसणार्‍या शेकडो शेतकर्‍यांनी अर्ज भरुन शासनाचा निषेद केलेला आहे.

तालुक्यातून प्रत्येक गावातून अर्ज भरण्यात येणार असून महामहिम राज्यपालांना अर्ज पाठविण्यात येणार आहेत. याप्रसंगी हिंमत पाटील, रामसिंग गिरासे, कोमलसिंग राऊळ, रमेश पाटील, निळकंठ पाटील, सुरेश जाधव, केशव पाटील, आर.बी.पाटील आदींसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*