अजय सुस्ते बालकरत्न पुरस्काराचा मानकरी

0
शिरपूर । दि.14 । प्रतिनिधी-एस.व्ही.के.एम. संस्थेच्या शिरपूर तालुक्यातील तांडे येथील मुकेशभाई आर.पटेल मिलीटरी स्कूलचा विद्यार्थी अजय देविदास सुस्ते याने भारतीय हिंदी राष्ट्रभाषा परिक्षेत घवघवीत यश प्राप्त करुन राष्ट्रीय राष्ट्रभाषा ‘बालकरत्न’ पुरस्कार प्राप्त करुन सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे.
अखिल भारतीय राष्ट्रभाषा विकास समितीतर्फे घेण्यात आलेल्या अखिल भारतीय हिंदी राष्ट्रभाषा परिक्षेत 96 टक्के गुण मिळवून अजय देविदास सुस्ते हा मुंबई विभागात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.

त्याला राष्ट्रीय राष्ट्रभाषा बालकरत्न पुरस्कार जाहीर झाला असून त्याला सुवर्णपदक देवून गौरविण्यात आले आहे. त्यांच्या यशाबद्दल एस.व्ही.के.एम. संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री आ.अमरिशभाई पटेल, संस्थेचे सह-अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, संस्थेचे व्यवस्थापन समिती सदस्य् राजगोपाल भंडारी, प्राचार्य दिनेशकुमार राणा यांनी कौतुक केले आहे. त्याला शशिकांत जाधव व प्रदिप गिरासे यांचे मार्गदर्शन लाभले.

 

LEAVE A REPLY

*