मराठा फोरमतर्फे वधू-वर परिचय प्रबोधन शिबिर

0

धुळे / खान्देश कुणबी पाटील मराठा फोरमतर्फे वधू-वर परिचय प्रबोधन शिबिराचे दि.10 मे रोजी दुपारी 11 वाजता आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संजय पाटील यांनी दिली.

समाज बांधवांनी मुला-मुलींचे दोन रंगीत फोटो, बायोडाटासह नाव नोंदणी सनी क्लासेस व मंदार संस्कार केंद्र, श्रीरंग कॉलन, देवपूर, राजेंद्र पाटील स्वामी समर्थ सायकल मार्ट, दत्तमंदिर चौक देवपूर येथे संपर्क साधण्याचे आवाहन  केले आहे.

वधू-वर परिचय प्रबोधन शिबिरासंदर्भात अधिक माहितीसाठी अनिलकुमार पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन दिलीप पाटील, संजय निकम, संकेत सोनवणे, मंदार पाटील, गुलाब वाघ, रवींद्र पाटील, राजेंद्र पाटील, संजय बोरसे, दिनेश भदाणे, दिलीप सिसोदे, राजू पवार आदींनी केले आहे.

शिबिरात वधू-वरसंदर्भात वैयक्तिक समस्या, विधूर किंवा विधवा तसेच घटस्फोटित, नूतन वधू-वरासंदर्भात चर्चा होईल.

LEAVE A REPLY

*