पिंपळनेरला स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वित

0
सुभाष जगताप,पिंपळनेर । दि.14 ।-शेतकर्‍यांना हवामानाचा अंदाज यावा, हवामानाची योग्य माहिती तत्काळ कळावी यासाठी स्वयंचलित हवामान केंद्रे बसवण्यात येत असल्याने आता शेतकर्‍यांना कृषी विभागांतर्गत माहिती मिळून शेतकरी कल्याणाचा विकास साधण्याचा प्रयत्न होणार आहे.
महावेध प्रकल्पातंर्गत स्वयंचलित हवामान केंद्र हे महाराष्ट्र शासन आणि स्कायमेट वेदर सर्व्हीसेस प्रा.लि.यांचा हा सार्वजनिक खासगी भागीदारी प्रकल्प असून कृषी विभागामार्फत शेतकर्‍यांना हवामान केंद्राद्वारे आता मदत होवून याचा फायदा शेतकर्‍यांना होईल.
यासाठीच वेध हवामानाचा ध्यास शेतकरी कल्याणाचा या ब्रीद वाक्याप्रमाणे या स्वयंचलित हवामान केंद्राच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टींची माहिती मिळणार आहे.

यात पाऊस, हवेची दिशा, हवेची गती, तापमान व आद्रता याची प्रत्येक तासाची माहिती महावेधच्या पुणे, मुंबई, नोयडा या कार्यालयाला प्राप्त होईल.

संबंधीत तालुका तहसील कार्यालयाकडे त्याची माहिती कळविली जाईल. हे हवामानाचे दूरक्षेत्र केंद्र कमीत कमी 15 कि.मी.अंतरापर्यंतचे आहे.

अंदाजे 15 कि.मी. अंतरापयंतची माहिती या हवामान केंद्रात वेळोवेळी नोंद होणार आहे, प्रत्येक 1 तासाची माहिती मुख्यालयात मिळत राहील.

सदर महावेध स्वयंचति हवामान केंद्र हे येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात बसवण्यात आले असून सुरु होऊन या भागातील माहिती संकलित करण्याचे काम सुरु झाले आहे.

या हवामान केंद्राला रेनगेस बसवण्यात आले असून पाऊस व त्याची मात्रा कळेल. तसेच हवामान केंद्राला जीपीआरएस सिस्टीम असून यासंदर्भातील सर्व माहिती संकलीत होवून मुख्यालयास टाईम सेट नुसार कळणार आहे, तसेच बॅटरी चार्जिंगसाठी सोलर प्लेट बसवण्यात आली आहे.

तसेच एरिअलने जीपीआरएस सिस्टीमला देण्यात आलेला आहे. तसेच सर्वात उंचावर अल्ट्रासॉनीक बसवण्यात आले असून यामुळे हवेची दिशा व गती त्याचबरोबर तापमान व आद्रता कळणार आहे.

सदर हवामान केंद्र हे आतापर्यंत पिंपळनेर, दहिवेल, देवजीपाडा, कुडाशी, कासारे, उंभरपाटा, जैताणे बसवण्यात आले आहे.

साक्रीतही हे हवामान केंद्र बसवण्यात येणार आहे, हे हवामान केंद्र बसवण्याचे काम सन्नी सिंग, विलास गोपाल यांच्यासह युवराज चौधरी हे बसवत आहे.

राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे पिंपळनेर येथे सेवानिवृत्त कार्यक्रमाप्रसंगी आले असता त्यांनी शेतकर्‍यांना हवामानाची माहिती व्हावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात हवामान केंद्र अंदाजे दोन हजारापेक्षाही जास्त हवामान केंद्र राज्यशासन बसवणार असून हवामान केंद्राची माहिती शेतकर्‍यांना कळणार असल्याने शेतकर्‍यांचा हवामानाचा अंदाज होवून नियोजन करण्यास मदत होईल असे म्हणाले होते.

 

LEAVE A REPLY

*