पोलीस मुख्यालयात महिला विश्रामगृहाचे लोकार्पण

0
धुळे । दि.14 । प्रतिनिधी-नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनय चौबे यांच्याहस्ते पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस मुख्यालय येथील गार्ड रुम तसेच शहर वाहतुक कार्यालयाच्या परीसरातील असलेल्या महिला अधिकारी, अमंलदार यांच्या विश्रामगृहाचे उद्घाटन करण्यात आले.
याचवेळी आझादनगर पोलिस स्टेशनमधील गुन्हातील मुद्देमाल आझादनगर पोस्टेच्या पथकाने हस्तगत केला. सदर मुद्देेमाल न्यायालयाचे आदेश झाल्यानंतर विशेष पोलीस महानिरिक्षक श्री.चौबे यांच्याहस्ते फिर्यादी प्रमिला सुधाकर चौधरी रा.अग्रसेन कॉलनी विठ्ठल मंदिर समोर धुळे यांनी स्विकारला.
मोहाडी पोलिस ठाण्यातील सोन्याचा एकुण एक लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल मोहाडी पोस्टेच्या पथकाने हस्तगत केला. सदर मुद्देमाल न्यायालयाचे आदेश झाल्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक श्री.चौबे यांच्याहस्ते फिर्यादी इंद्रजितसिंग दर्शनसिंग पांदे रा.शिवानंद पंजाबी कॉलनी मेाहाडी धुळे यांनी स्विकारला.

पश्चिम देवपूर पोस्टे गुन्हयातील मुद्देमाल पश्चिम देवपूर पोस्टेच्या पथकाने हस्तगत केला. सदर मुद्देमाल न्यायालयाचे आदेश झाल्यानंतर विशेष पोलीस महानिरिक्षक श्री.चौबे यांच्याहस्ते फिर्यादी चेतन बन्सीलाल शेंडे यांचेतर्फे अनिल मोरेश्वर जोधी, धुळे यांनी स्विकारला.

त्यांनतर स्थागुशाचे पोलीस निरिक्षक श्री.परदेशी, सहा.पोलीस निरिक्षक हेमंत पाटील, सहा.पोलीस निरीक्षक श्री.वारे यांचा विशेष पोलीस महानिरिक्षक श्री.चौबे यांच्याहस्ते प्रशस्तिपत्र देउन सत्कार केला

तसेच साक्री पोलीस ठाण्यात घडलेल्या गुन्हयात पोलीस निरिक्षक वसावे यांनी उत्कृष्टपणे तपास करुन गुन्हा शाबित होउन न्यायालयाने आरोपीताला जन्मठेपेची शिक्षा व रुपये एक हजार रूपये दंड अशी शिक्षा दिली.

तसेच नरडाणा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक बी.एम.काळे यांनी उत्कृष्टपणे तपास करुन गुन्हा शाबित हेाऊन न्यायालयाने आरोपीताला जन्मठेपेची शिक्षा व एक हजार रुपये अशी शिक्षा दिली. याबाबत विशेष पोलीस महानिरिक्षक श्री.चौबे यांच हस्ते प्रशस्तिपत्र देउन सत्कार केला.

सदर कार्यक्रमास पोलीस अधीक्षक एम.रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक श्री.पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, धुळे शहर श्री.जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरपूर विभाग श्री.तडवी, उपविभागीय पोलीस अधिकारी, साक्री विभाग श्री.सोनवणे, प्रभारी पोलीस उप अधिक्षक, श्री.गवळी, पोलीस निरिक्षक स्था.गु.शा श्री.परदेशी, शाखेचे प्रभारी अधिकारी, अमंलदार, पत्रकार उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*