मुद्रा योजना तळागाळापर्यंत पोहोचवा – ना. डॉ.भामरे

0
धुळे । दि.14 । प्रतिनिधी-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून मुद्रा योजना आकारास आली आहे. या योजनेतून गरजूंनी उद्योग, व्यवसाय सुरू केले आहेत.
या योजनेच्या प्रसिध्दी मोहिमेमुळे ही योजना तळागाळापर्यंत पोहोचेल, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नवीन नियोजन भवनात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांच्या हस्ते प्रधानमंत्री मुद्रा योजना जिल्हा समन्वय समिती, धुळे व नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन यांनी तयार केलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या स्क्रोलर्सचा लोकार्पण सोहळा झाला.

यावेळी प्रधानमंत्री मुद्रा योजना जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत, आर. पी. शर्मा, सहआयुक्त पी. के. राऊत उपस्थित होते.

जिल्हा माहिती अधिकारी श्री. राजपूत यांनी प्रास्ताविकात प्रसिध्दी मोहिमेची सविस्तर माहिती दिली.

 

LEAVE A REPLY

*