टोकरे कोळी समाजावरील गुन्हे मागे घ्या !

0
दोंडाईचा । दि.14 । वि.प्र.-टोकरे कोळी,महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाला सोप्या पद्धतीने अनुसुचीत जमातीचा दाखला व वैधता प्रमाणपत्र मिळावे यासाठी दि.10 ऑगस्ट 2009 रोजी मोर्चेकरूवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
तरी त्यावरील गुन्हे मागे घ्यावी अशी मागणी आदिवासी वाल्मिकलव्य सेनेचे संस्थापक प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी पोलिस अधिक्षकांकडे केली.
निवेदनात म्हटले आहे की, टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाच्या विविध मागण्यासाठी अनंत तरे, शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला होता.

त्यावेळी निवासी उपजिल्हाअधिकारी प्रकाश वाघमारे यांनी बसून निवेदन स्वीकारल्यावरून किरकोळ वाद निर्माण झाला होता.

या वादावरून पोलिसांनी मोर्चेकरूनवर लाठीमार करत गोळीबार केला होता. यात वडाळी ता.शहादा येथील भटू कुंवर शहीद झाले तर शेकडो कार्यकर्ते जखमी झाले होते.

या घटनेची चौकशी न्याय दंडाधिकारींमार्फत करण्यात आली होती. त्या चौकशीत पोलिसांवर कमी वेळात जास्त बळाचा वापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता .

तसेच मोर्चेकरांनी कोणतेही सरकारी व खाजगी मालमत्तेचे नुकसान झालेले केलेले नाही. तरी टोकरे कोळी समाजावरील गुन्हे मागे घेण्याची शिफारस करावी अशी मागणी पोलिस अधिक्षक एस रामकुमार यांना निवेदनाव्दारे आदिवासी वाल्मिकलव्य सेनेचे संस्थापक प्रमुख शानाभाऊ सोनवणे, संजय मगरे शिवसेनेचे दोंडाईचा उपशहरप्रमुख मनोज परदेशी, युवासेना शहरप्रमुख रोहित माळी, सारंग पाटील, दिपक ठाकुर आदींनी केली.

 

LEAVE A REPLY

*