अजित पवार, सुनील तटकरे आज धुळ्यात

0
धुळे । दि.13 । प्रतिनिधी-विधी मंडळ पक्षनेते आ.अजितदादा पवार हे उद्या दि.14 रोजी जिल्हा दौर्‍यावर येत असून येथील राजर्षी शाहू महाराज नाट्यगृहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा दुपारी 3 वाजता कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना बांधणी, वेगवेगळया विभागाच्या नेमणुका याबाबत या दौर्‍याचे नियोजन आहे. सदर दौर्‍यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, युवती प्रदेशाध्यक्षा स्मिताताई पाटील, माजी खा.तथा धुळे जिल्हा प्रभारी रणजितसिंह मोहिते पाटील, पक्ष निरीक्षक रंगनाथ काळे, सामाजिक न्याय प्रदेशाध्यक्ष आ.अ‍ॅड.जयदेव गायकवाड, किसान सेल राज्य प्रमुख शंकर आण्णा धोंडगे, वक्ता प्रशिक्षण सेलचे राज्यप्रमुख प्रदीप सोळंके, इतर मागासवर्गीय सेलचे राज्य प्रमुख ईश्वर बाळबुधे, ग्रंथालय सेलचे राज्य प्रमुख शिवाजीराव पाटील, साहित्य कला व सांस्कृतिक सेलचे राज्य प्रमुख लक्ष्मीकांत खाबीया, आय.टी.सेलचे राज्य उपप्रमुख संदीप पवार आदी उपस्थित राहणार आहेत.

धुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, पक्षाचे सर्व सेलचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, शहराध्यक्ष मनोज मोरे आदींनी केले आहे.

 

 

LEAVE A REPLY

*