शिरपूर ठाण्यातील चार पोलीस निलंबित

0
शिरपूर । दि.13 । प्रतिनिधी-शिरपूर न्यायालयात आरोपींना हजर करतेेवेळी हलगर्जीपणा दाखवल्याच्या कारणावरून शिरपूर पोलीस ठाण्यातील चार कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे.
धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक एम.रामकुमार यांनी हा आदेश दिला. एकाच वेळी चार कर्मचारी निलंबित होण्याची शिरपूर पोलीस ठाण्याच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.

शहरातील निमझरी नाका ते करवंद नाका रस्त्यावरील मर्चंट बँकेच्या इमारतीसमोर बाबुजी सुपरशॉप हे दुकान फोडून आठ हजार चोरून नेल्याच्या संशयावरून पोलिसांनी अनिल रूमाल्या पावरा व राहुल शिवराम बारेला यांना अटक केली होती.

11 जुलैला दोघांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना शिरपूर न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर कोर्टरूमशेजारील खोलीत नेत असतांना पोलिसांच्या हाताला हिसका देवून ते फरार झाले. दोन दिवस शोध घेवूनही ते सापडले नाहीत.

त्यांना न्यायालयात हाताळतांना निष्काळजीपणा दाखवल्याच्या कारणावरून हेकॉ गुरूदत्त नारायण पानपाटील, गुलाब गिरधर ठाकरे, मुकेश बहादूरसिंग पावरा, रविंद्र सुकलाल ईशी यांना निलंबित करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

*