सख्खा भाऊ पक्का वैरी…

0
धुळे । दि.13 । प्रतिनिधी-दारुच्या नशेत वहिनीला शिवीगाळ करणार्‍या लहान भावाची हत्त्या करुन त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी मोठा भाऊ, अल्पवयीन मुलगा आणि मोठ्या भावाचा सासरा या तिघांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व संशयितांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, मालेगाव तालुक्यात राहणारा गोरख अर्जुन केदार (वय 40) हा बोरकुंड, ता.धुळे येथे सासरवाडीला कुटुंबासह राहण्यासाठी आला होता.
त्याच ठिकाणी गोरखचा लहान भाऊ अनिल उर्फ अण्णा अर्जुन केदार (वय 30, रा.बोरकुंड) हा देखील राहण्यासाठी आला. अनिलला दारु पिण्याचे व्यसन होते.

दि.10 जुलै रोजी सायंकाळी अनिल दारु पिवून घरी आला. त्याने दारुच्या नशेत त्याच्या वहिनीला शिवीगाळ केली. त्याला गोरखने समजविण्याचा प्रयत्न केला, परंतु अनिल दारुच्या नशेत असल्याने ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

त्याला गोरखने मारहाण करुन त्याच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने मारुन त्याची हत्त्या केली. त्यानंतर गोरखने विनायक कौतिक मोरे आणि एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने अनिलचा मृतदेह बोरी नदीच्या पात्रात डिझेल व पेट्रोल टाकून जाळून टाकला.

त्यानंतर दुसर्‍या दिवशी अनिल आत्या कासुबाई धर्मा नन्नवरे यांनी फोन करुन अनिलला मुलगी पाहण्यासाठी पाठवून द्या, असा फोन गोरखला केला.

गोरखने अनिल हा कामासाठी नाशिकला गेला आहे, असे सांगितले. त्यानंतर कासूबाई या बोरकुंडला आल्या. त्यांना भाच्याचा घातपात झाल्याचा संशय आला.

मयत अनिल केदार

त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक डी.व्ही.वसावे यांनी तपास चक्रे फिरवले.त्याचवेळी चौकशीसाठी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.

अनिलची हत्त्या कशी केली व मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली हे पोलिसांना सांगितले. त्यानंतर भादंवि 302, 201, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

गोरख केदार, विनायक मोरे आणि अल्पवयीन मुलाला अटक केली. तसेच ज्या ठिकाणी मृतदेह जाळला होता त्या ठिकाणी अनिलची जळालेली हाडे पोलिसांना आढळून आले.

घटनास्थळाची पाहणी डीवायएसपी नीलेश सोनवणे, पोलिस निरीक्षक डी.व्ही.वसावे, पोलिस उपनिरीक्षक सी.टी.सैंदाणे यांनी केली. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक सी.टी.सैंदाणे हे करीत आहेत.

 

 

LEAVE A REPLY

*