शिंदखेड्यात काँग्रेसचे आंदोलन

0
दोंडाईचा । दि.13 । वि.प्र.-काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांच्या उपस्थितीत शिंदखेडा तालुक्यातील सर्व बँकांना एकाच दिवशी निवेदने देण्यात आली.
ज्येष्ठ नेते पांडुरंग माळी, माजी उपसभापती शामकांत पाटील, पं.स.सदस्य मनोहर देवरे, शहराध्यक्ष मनोज धनगर, माजी सभापती जितेंद्र गिरासे, रामीचे सरपंच बापू महाजन, युवक काँग्रेस अध्यक्ष सचिन सोनवणे, नितीन देसले, आबा मुंडे, नगरसेवक नंदू सोनवणे, माजी नगरसेवक अशोक सोनवणे, भोगूसिंग गिरासे, पृथ्वीराज कोळी, राकेश राजपूत, जितेंद्र चव्हाण, प्रतीक देशमुख, कांतीलाल पाटील, निंबा पाटील, अविनाश बागूल, जगन्नाथ पाटील, बंटी जाधव, हर्षल पाटील, भैय्या माळी आदी निवेदन देतांना उपस्थित होते.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक अनंत सागर, देना बँकेचे शाखा व्यवस्थापक सागर आसापुरे, बँका ऑफ महाराष्ट्राचे शाखा व्यवस्थापक मनिष साळवी, युनियन बँकेचे शाखा व्यवस्थापक ठाकूर, स्टेट बँक ऑफ इंडिया, धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, आयसीआयसीआय आदी बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनाही काँग्रेस पक्षाकडून निवेदन देण्यात आले.

निवेदनात सरसकट कर्जमाफी व नवीन कर्ज त्वरित उपलब्ध करुन देण्यात यावे. नियमीत कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना केवळ कर्जाच्या 25 टक्के किंवा 25 हजाराची मदत तोकडी आहे.

शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करा, या आशयाच्या मागणीसाठी दहा हजार कर्ज दिलेल्या शेतकर्‍यांच्या संख्येचीही मागणी करण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

*