अडीच कोटींच्या रस्ते कामांचे लोकार्पण व वचनपूर्ती सोहळा

0
दोंडाईचा । दि.12 । प्रतिनिधी-येथील नगरपालिकेच्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केवळ 6 महिन्यात करण्यात आली असून निवडणुकीत दिलेल्या प्रत्येक रस्त्यांची कामे पूर्ण केली आहेत.
त्याची एकूण किंमत सुमारे अडीच कोटी रूपये आहे. या रस्त्यांचा लोकार्पण सोहळा उद्या दि.14 रोजी दुपारी 3 वाजता केशरानंद पेट्रोलपंपजवळ राज्याचे रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याहस्ते आयोजित करण्यात आलेला आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.नयनकुंवरताई रावल असतील तर प्रमुख पाहुणे म्हणून सरकारसाहेब रावल, बाजार समितीचे सभापती तथा महाराष्ट्र पणन संघाचे संचालक नारायण पाटील, माजी नगराध्यक्षा व्ही.आर.सिसोदिया, दादासाहेब रावल दूध संघाचे चेअरमन विक्रांत रावल, उपनगराध्यक्ष नबु बशिर पिंजारी, पाणीपुरवठा सभापती करणसिंग देशमुख, बांधकाम सभापती संजय मराठे, आरोग्य सभापती सौ.वैशाली महाजन, शिक्षण सभापती प्रियंका ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती अमरिन बागवान, स्थायी समितीचे सदस्य रवी उपाध्ये, भाजपाचे प्रचारप्रमुख तथा नगरसेवक एकनाथ भावसार, यांच्यासह सर्व नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित असतील.

दरम्यान, निवडणुकीत 6 महिन्यात शहरातील सर्व प्रमुख रस्त्याची कामे पूर्ण करण्याचे आश्वासन पर्यटन व रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनी दिले होते.

त्यानुसार केशरानंद पेट्रोलपंप ते जे.जे.हॉस्पीटल हा कॉलनी भाग आणि गांव जोडणारा रस्ता, शिवाजी महाराज पुतळा ते शामसुंदर प्रोव्हीजन हा स्टेशन भागातील मुख्य रस्ता, गणपती मंदिर ते गुरव रिक्षा स्टाप हा गांवभागातील नागरीकांना स्टेशन कडे जाणारा मुख्य रस्ता, विदयानगरमधील 3 रस्ते, साई बाबा मंदिर ते कबीरवाडी पर्यतचा रावल नगरमधील रस्ता, नंदूरबार रोडवरील बॉक्स पुलाचे काम, कॉलनी भागातील नागरीकांना बस स्टॅन्डकडे जाण्यासाठी अतिशय सोयीचा असणारा राणी मॉ साहेब चंद्रकुंवरजी रावल मार्ग, जय हिंद कॉलनीतील रस्ता, हस्ती कॉलनीतील रस्ता, असे एकुण 13 रस्त्यांसाठी सुमारे अडीच कोटी रूपये खर्च करण्यात आलेले आहेत, ही सर्व कामे पूर्ण झाली असून या कामांचा लोर्कापण आणि वचनपूर्ती सोहळा कार्यक्रम पालिकेकडून आयोजित करण्यात आलेला आहे.कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याधिकारी अजित निकत व अभियंता जगदिश पाटील यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

*