कोपर्डी घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करा !

0
धुळे । दि.13 । प्रतिनिधी-अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराने हत्येप्रकरणाला एक वर्ष पूर्ण झाले असून अद्यापही निकाल लागलेला नाही.
फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये खटला सुरु असतांना न्याय मिळण्यास उशिर होत आहे, ही दुर्दैवाची बाब आहे. या घटनेचा खटला लवकरात लवकर पूर्ण करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.यासाठी आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे आज मूकमोर्चा काढण्यात आला.

याबाबत निवेदनात म्हटले आहे की, राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. सरकार स्त्रीयांच्या बाबतीत असंवेदनशिल आहे.

महिला सुरक्षेबाबत सरकारची उदासीन भूमिका असून गृह खाते स्वतःकडे ठेवून मुख्यमंत्र्यांनी या विषयावर मौन बाळगले आहे.

कायदा सुव्यवस्था राखण्यास पूर्णपणे अपयशी ठरले असून गृहखात्याला स्वतंत्र गृहमंत्री देण्याबाबत ते नकारात्मक आहेत. स्त्रिच्या आत्मसन्माला ठेच पोहचविणार्‍या गुन्हेगाराला वचक बसला पाहिजे.

स्त्री सक्षमीकरणाचा डंका वाजविणारे सरकार प्रत्यक्षात कोणतीच कारवाई करीत नाही. कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातदोषींवर कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनावर महापौर सौ.कल्पना महाले, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या सौ.ज्योती पावरा, यशस्वीनी अभियानाच्या राज्यसमन्वय डॉ.सुवर्णा शिंदे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मिनल पाटील, मनपा सभापती इंदुताई वाघ, राधिका ठाकूर, श्रध्दा ठाकूर, आरती पवार, दिपा वानखेडे, सौ.राजश्री शिंदे, भारती मोरे, प्रणीता शिंदे, सविता वाल्हे, यमुनाताई जाधव, सौ.ललिता आघाव, सौ.सारीका पवार आदिंच्या स्वाक्षर्‍या आहेत.

 

LEAVE A REPLY

*