इनरव्हील ऑफ धुळे क्रॉसरोडचे पदग्रहण

0
धुळे । दि.13 । प्रतिनिधी-येथील इनरव्हील क्लब ऑफ धुळे क्रॉसरोडचा पदग्रहण समारंभ नुकताच झाला. 2017-18 चा वर्षासाठी सौ.भविता देवरे तर सेक्रेटरीपदी क्षिप्रांजली काळे यांची निवड करण्यात आली.
या पदग्रहण समारंभास डिस्ट्रीक्ट चेअरमन सुरक्षा बाटला तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हूणन जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मागील वर्षात ज्या सदस्यांनी चांगले काम केले त्या सदस्यांच्या उपस्थितीत मान्यवरांनी स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

नूतन अध्यक्षा सविता देवरे यांनी मावळत्या अध्यक्षा रेखा जैन यांच्याकडून पदभार स्वीकारला. तर नूतन सेक्रेटरी क्षिप्रांजली काळे यांनी मावळत्या सेक्रेटरी सोनाली पाटील यांच्याकडून पदभार स्वीकारला.

प्रेसीडेंट कविता बिरारी, आय.पी.पी. रेखा जैन, ट्रेझरर स्वाती भट्ट, एडिटर सेनाली पाटील, आयएसओ प्राची श्रॉफ, जॉ.सेक्रेटरी रुपाली चंद्रात्रे, एक्झीकेटीव्ह कमेटी सदस्य दामिनी गरुड, सारीका सराफ, राजश्री चौधरी, डॉ.अमिता रानडे, डॉ.मिनल पाटील, रश्मी देशमुख, भारती अहिरराव, मिनल अग्रवाल, शिल्पा रघुवंशी, या सर्व कार्यकारणीला डिस्ट्रीक्ट चेअरमन सुरक्षा बाटला यांनी शपथ दिली.

जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचन कविता बिरारी व वैशाली जमदार या सदस्यांनी केला.

 

 

LEAVE A REPLY

*