सुकाणू समितीची यात्रा धुळ्यात अडवू-रवि देवांग यांचा इशारा

0
धुळे । दि.13 । प्रतिनिधी-शेतकरी जागरण यात्रा कृषी महाविद्यालयाजवळ अडविण्यात येईल, असा इशारा रवी देवांग यांनी दिला आहे.
महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी सुकाणू समितीने नाकारली आहे. ही शेतकरी जागरण यात्रा धुळे येथे दि.14 जुलै रोजी मुक्कामी येत आहे. सुकाणू समितीत 80 शेतकरी संघटनांचा समावेश आहे.

गेल्या तीन वर्षात भाजपा सरकारची वाटचाल ही शेतकरी हिताची नाही. केवळ जमिनीची रासायनिक कुंडली आणि निम कोटेड युरीया याने शेतकर्‍यांचे कल्याण होत नाही.

शेतकर्‍यांची आमदनी दुप्पट होण्यासाठी 2022 पर्यंत वाट पहावी लागणार आहे. तोपर्यंत आणखी एक लाख शेतकर्‍यांच्या आत्महत्या करतील त्याचे काय? पुन्हा दुसर्‍या कर्जमाफीची वेळ येईल.

पाच वर्षात महामार्ग 30 टक्क्यांनी वाढणार आहे. अशा शेतकरी विरोधी भाजपा सरकारला शेट्टींचा पाठींबा आहे. ही गोष्ट सुकाणू समितीला मान्य नाही? साक्री येथील सभेत या संदर्भात खुलासा होईल का अशी अपेक्षा आहे.

याबाबत उत्तरे न मिळाल्यास ही यात्रा कृषी महाविद्यालयाजवळ अडविण्यात येईल, असा इशारा रवी देवांग यांनी दिला आहे.

 

LEAVE A REPLY

*