दोंडाईचा येथे वाहकाच्या कानशिलात लगावली : दोघांविरुद्ध गुन्हा

0
धुळे । दि.13 । प्रतिनिधी-इंडिका कारला बसचा धक्का लागल्याच्या कारणावरुन वाहकाची गच्ची धरुन त्याच्या कानशिलात दोघांनी लगावली.
तसेच सरकारी कामात अडथळा आणला. ही घटना दोंडाईचा, ता.शिंदखेडा येथील बसस्थानकात घडली. या प्रकरणी दोन जणांविरुध्द दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, दि.12 जुलै रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास दोंडाईचा बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातून एस.टी. (क्र.एमइच 20 बीएल 3101) बसस्थानकात आणत असताना उभ्या असलेल्या इंडिका कारला बसचा धक्का लागला.

यातून विक्की उर्फ विवेक अजय निकवाडे याने बसचा वाहक राजेंद्र गंगाराम पाटील यांच्याशी वाद घातला व या वादातून त्यांची गच्ची दोघांनी धरुन त्यांच्या कानशिलात लगावली. तसेच शासकीय कामात अडथळा आणला, अशी फिर्याद दोंडाईचा पोलिस ठाण्यात राजेंद्र गंगाराम पाटील यांनी दिली.

भादंवि 353, 183, 323, 504, 506, 34 व मोटार वाहन कायदा कलम 110, 112, 127 प्रमाणे विक्की उर्फ विवेक अजय निकवाडे आणि प्रताप राजाराम भोई यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

मोटारसायकल चोरी – शिरपूर शहरातील प्रेमकमल नगरात राहणारे रतिलाल गोरख पाटील यांनी त्यांच्या मालकीची 15 हजार रुपये किंमतीची एमएच 18 एडी 7303 ही रिक्रॅशन समोर लावलेली होती. अज्ञात चोरट्याने सदर मोटारसायकल चोरुन नेली. याबाबत रतिलाल गोरख पाटील यांनी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहा जण जखमी – मुंबई आग्रा महामार्गावरुन एटी 0315 क्रमांकाची बस भरधाव वेगाने नेत असताना बिजासनी पोलिस चौकीसमोर बसने अज्ञात वाहनाला धडक दिली. या अपघातात खेराम चंड्या सोळंकी, अनिता खेराम सोळंकी, सुकलाल सारेला, रिंकू उर्फ योगेंद्र गुलाबसिंह कुरावाह आणि राकेश सुकलाल सारेला हे जखमी झाले, अशी फिर्याद पप्पू सिताराम सोळंकी यांनी शिरपूर पोलिस ठाण्यात दिली. भादंवि 279, 337, 338, 427, मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे योगेंद्र सुहाससिंग कुरावाह याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

 

 

LEAVE A REPLY

*