हस्ती स्कूलच्या फेन्सिंगपटूंचे राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत घवघवीत यश

0
दोंडाईचा । दि.13 । वि.प्र.-हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलीत, हस्ती पब्लिक स्कूल अ‍ॅॅन्ड ज्यु.कॉलेज-दोंडाईचा येथील
फेन्सिंगपटूंनी नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले.
स्पर्धेच्या वैयक्तिक व सांघीक तलवारबाजी खेळ प्रकारात हस्तीच्या फेन्सिंगपटूनी वैयक्तिक तलवारबाजी स्पर्धेत सहभाग घेतला होता.
सदरची स्पर्धा महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशन व नांदेड जिल्हा तलवारबाजी असोसिएशन यांचे वतीने आयोजित करण्यात आली होती.

कानन जैन-फॉईल-सुवर्ण पदक व योगेश अग्रवाल-ईपी-रजत पदक प्राप्त केले. यास्तव या दोन्ही फेन्सिंगपटूंची आगामी नाशिक येथे होणार्‍या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेकरिता निवड करण्यात आली.

तसेच सांघीक तलवारबाजी स्पर्धेत- स्वयं बोरसे, योगेश अग्रवाल, निखिल पाटील व आर्यन भावसार – ईपी प्रकारात-सुवर्ण पदक आणि यश जैन, चिन्मय पाटील,अथर्व गोस्वामी, कृपाल चौधरी-सॅबर प्रकारात रजत पदक मिळविले.

या सर्व खेळाडूंनी स्पर्धेत तलवारबाजी खेळाचे कौशलयपूर्ण प्रदर्शन केले. यास्तव स्पर्धेतील चॅम्पीयनशिपच्या द्वीतीय क्रमांकाचे पारितोषीक धुळे जिल्ह्याला प्राप्त झाले.

विशेष स्पर्धेदरम्यान या फेन्सिंगपटूंनी नांदेडच्या प्रसिद्ध शिख गुरुद्वारा येथेच निवास केला व लंगर भोजन घेतले. तसेच शिख धर्माविषयी माहितीही घेतली.

यामुळे या विद्यार्थ्यांना सर्व धर्म समभाव मुल्य जाणीवांच्या संस्काराचे प्रत्यक्ष उदाहारण शिकायला मिळाले.

यशस्वी फेन्सिंगपटूंना हस्ती स्कूल फेन्सिंग कोच-विशाल पवार, क्रीडा शिक्षक-लखन थोरात, शिक्षिका-पुष्पा साळवे यांचे मार्गदर्शन लाभले.

 

LEAVE A REPLY

*