अमरनाथ यात्रेकरुंवरील हल्ल्याचा निषेध

0

 

धुळे । दि.13 । प्रतिनिधी-

शिरपूरला विहिंपचे आंदोलन

अमरनाथ यात्रेवर झालेल्या हल्ल्याचा शिरपूर येथील विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्यातर्फे शिरपूर शहरातील विजय स्तंभ जवळ सर्व पदाधिकारी एकत्र येऊन तीव्र स्वरूपात निषेध करण्यात आला असून पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला.

विश्व हिंदू परिषद व बजरंग दल च्या पदाधिकारी यांनी तहसीलदार यांना याबाबतचे निवेदन देखील देण्यात आले. संबंधित अतिरेकी दहशतवादयांवर सक्त कारवाई करण्यात यावे असे निवेदन दिले.

या वेळी वैभव भोंगे, हेमराज राजपूत, लक्ष्मीकांत जोशी, दादाभाऊ कोळी, नंदलाल चौधरी, सुनिल सूर्यवंशी, अमोल लोणारी, मंगेश रखमे, स्वप्नील पाटील, दिपक महाजन, कैलास वारुळे, राजेंद्र शेटे, एम एस धाकड, महेश माळी, मुकेश माळी, गोलू माळी, जगदीश कोळी आदी उपस्थित होते.

पाकिस्तान व चीनचा निषेध

अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या निंदनीय हल्ल्याचा आणि पाकिस्तानला पाठिशी घालणार्‍या चीनचा ध्वज जाळून निषेध करण्यात आला.

काही दिवसांपासून भारत-चीन सीमेवर चीनी सैनिकांनी आपल्या देशात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी भारतीय सैनिकांना धक्कबुक्की केली.

चीनचा हा आडमुठेपणा भारतीयांनी त्यांच्या उत्पादीत मालावर बहिष्कार घालून कमी करावा असे आवाहन अभाविपतर्फे करण्यात आले.

तसेच पाकिस्तानी आतंकवाद्यांनी अमरनाथ यात्रेकरुंवर केलेल्या हल्लयात 8 जण मृत्यूमुखी पडले. या घटनेचा निषेध म्हणून अभाविपतर्फे चीन आणि पाकिस्तानचा ध्वज जाळून निषेध करण्यात आला.

यावेळी जिल्हा सहसंयोजक ज्योत्स्ना पाटील, शहुरमंत्री रोहन अग्रवाल, सहमंत्री पुना गुरव, शुभम देव, राहुल साठे, योगेश थोरात, स्वप्निल पाटील, हर्षल गुरव, रोहित माळी, गोरख माळी, सुबोध साळी, महेश निकम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

पाकिस्तानचा ध्वज जाळला 

अमरनाथ यात्रेवर झालेल्या हल्ल्याचा विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे तीव्र निषेध नोंदविण्यात आला आहे. यावेळी कोम्बींग ऑपरेशन राबविण्याची मागणी करण्यात आली.

सैन्य दलाचे जवान अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी डोळ्यात तेल घालून सुरक्षा राखण्याचा प्रयत्न करीत असतांनादेखील असा हल्ला होवू शकतो, याचा अर्थ अतिरेकी कारवाया करणार्‍यांचे नेटवर्क अजून ही सक्षम आहे.

काश्मीर घाटी अतिरेक्यांच्या तावडीतून मुक्त करायची असेल तर काही दिवस हा प्रदेश सैन्याच्या ताब्यात देणे आवश्यक आहे.

तसेच केवळ जम्मू-काश्मिरमध्येच नव्हे तर देशभरात कुठेही अतिरेक्यांना मदत करणार्‍या स्थानिक शक्ती असतील तर त्यांना शोधून काढण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन करण्याची आवश्यकता आहे, असे विहीप व बजरंग दलाने पत्रकात म्हटले आहे.

या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्यावतीने मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात निदर्शने करण्यात आली. यावेळी भाऊ महाराज रुद्र, निफाडकर गुरुजी, योगीराज मराठे, भरत देवळे, गोवर्धन पटेल, अजय अग्रवाल, निलेश दीक्षित, राजेंद्र खंडेबवाळ, रोहिणीताई पटेल, भारतीताई बाविस्कर, अ‍ॅड. कुंदन पवार, वैभव देशपांडे, विशाल विसपुते, डॉ. महेश घुगरी, मुकेश खंडेबवाळ, शिरीष शर्मा, भूषण शर्मा, संतोष भावसार, मयुर शर्मा, सागर कोडगीर, लोकेश चौधरी, प्रदीप पाटील, राजू कापडणीस, वैभव सुधीर देशपांडे आदी उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

*