कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांचा गुन्हा काय ?

0
धुळे । दि.12 । प्रतिनिधी-शेतकर्‍यांची हालत अतिशय गंभीर झाली आहे. यामुळे मुलांची लग्ने होत नाहीत. दुष्काळ आणि नापिकीचा फेरा टळत नाही.
आई-वडिलांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढल्याने मुला-मुलींच्याही आत्महत्या होत आहेत. परंतू राज्यातील निर्दयी सरकारला पाझर फुटत नाही
.कर्जमुक्ती हा कायमचा उपाय नसला तरी शेतकर्‍यांनाही मन आहे. शिवसेना शेतकर्‍यांची ‘मन की बात’करते. कर्जमाफीचा निर्णय घेतांना नियमीत कर्जफेड करणार्‍यांवर अन्याय कशासाठी? कर्जफेड करणे हा त्या शेतकर्‍यांचा गुन्हा झाला का?त्यांना कवड्या देवून अपमानित कशाला करता? तुमचे मंत्रिमंडळ राज्यात फिरवा आणि शेतकर्‍याची खरी परिस्थिती जाणून घ्या, असे जळजळीत सवाल करून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राज्यातील फडणवीस सरकारवर टिकास्त्र सोडले.

कर्जमुक्तीचे श्रेय घेत असल्याची टिका आमच्यावर केली जाते. मात्र, शेतकर्‍याच्या कर्जमुक्तीसाठी लढणारी शिवसेना एकमेव आहे. शिवसेना छप्पर देणारी संघटना आहे. शेतकर्‍याला दु:खातून मुक्त करेपर्यंत मी कोणाचाही सत्कार स्विकारणार नाही, असेही ठाकरे यावेळी म्हणालेे.

येथील कृषी उत्पन्न समितीच्या आवारात शिवसेनेचा आज शेतकरी संवाद मेळावा पार पडला. याप्रसंगी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना उध्दव ठाकरे बोलत होते.

व्यासपिठावर ना.दिवाकर रावते, ना.रामदास कदम, ना.गुलाबराव पाटील, ना.दादा भुसे, खा.चंद्रकांत खैरे, ना.विनायक राऊत, आ.डॉ.निलम गोरे, आ. किशोर पाटील, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, ग्रामीण जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, डॉ.माधुरी बाफना, माजी आ. शरद पाटील, माजी आ. चिमणराव पाटील आदी उपस्थित होते.

अजित पवार आणि तुमच्यात फरक काय ?
गेल्या निवडणुकीत धरणात लघुशंकेची भाषा करणार्‍यांना जनतेने लाथा घातल्या. तरीही अजित पवार आमच्यावर टिका करतात.शिवसेनेला दुतोंडी गांडूळ म्हणतात.मात्र,आम्ही गांडूळ असलो तरी शेतकर्‍यांचे मित्र आहोत,हे अजित पवारांनी जाणावे.

आज सिंचनाची वाट लागली आहे, वीज मिळत नाही, हमीभाव नाही मग शेतकर्‍याने कर्जफेड करायची कुठून? कर्ज बुडवायला शेतकरी काही लुटारु नाही.

मात्र, सरकारने उल्लू बनविण्याचा प्रयत्न करु नये.आम्ही सरकारमध्ये आहोत, पण गोरगरीबांचा आवाज म्हणून. गिरीश महाजन सिंचन प्रकल्पांची भाषा करतात.

त्यांच्याकडे वीज आहे कुठे? काही लोक शेतकर्‍याला ‘रडतात साले’ असे म्हणतात. मग, अजित पवार आणि यांच्यात फरक काय? तिकडे केंद्रातील मंत्री व्यंकय्या नायडू हे कर्जमुक्तीला ‘फॅशन’ म्हणत आहेत.

परंतु महाराष्ट्रात कर्जमुक्तीसाठी त्यांच्या सरकारला शिवसेनेने महाराष्ट्रात झुकविले आहे, म्हणूनच मुख्यमंत्र्यांना कर्जमाफीची घोषणा करावी लागली, हे नायडूंनी विसरू नये, असा टोलाही उध्दव ठाकरे यांनी लागवला.

विखे पितापुत्रांना सेनेने मोठे केले
राज्याचे विरोधी पक्षनेत राधाकृष्ण विखे पाटील आमच्या ढोल वाजविण्यावर टिका करतात. मात्र, मुख्यमंत्र्यांसोबत मांडीला मांडी लावून ‘गुप्तगू’ करतात हे जनतेला का सांगत नाहीत? शिवसेनेने विखे पाटील पिता-पुत्राला राज्यात आणि केंद्रात मंत्रीपद देवून मोठे केले होते.

काँग्रेसने कधी त्यांची दखल घेतली का? असा सवा करून उध्दव ठाकरे म्हणाले की, कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री सतत दोन वर्ष, चार वर्ष मागे जात आहे.

आधी 2016, त्यानंतर 2012 आणि आता 2009 पर्यंतची कर्जमाफी करण्याची घोषणा केली आहे. प्रत्यक्षात कोणालाच दहा हजार रुपये मिळालेले नाहीत.

कोणालाच दीड लाखाची कर्जमाफी झालेली नाही.सातबारा उतारा कोरा करणे सरकारला शक्य झालेले नाही. आता सरकारने मागे जाण्यापेक्षा एक वर्ष पुढे यावे.

कर्जमुक्तीचे श्रेय शिवसेनेचेच
कर्जमुक्तीचे श्रेय शिवसेनेचेच आहे आणि शिवसेनाच घेईल.कारण दुष्काळात, आपत्तीच्या काळात शिवसेना शेतकर्‍यांसोबत राहीली आहे,असे सांगून उध्दव ठाकरे म्हणाले की, नोटबंदीच्या काळात किती श्रीमंत रांगेत उभे दिसले? शेतकर्‍याला त्यावेळी चोरासारखी विचारणा करण्यात आली नाही का? शेतकर्‍यांवर जी वेळ आली त्याला 2016-17 मधील यांचेच पाप कारणीभूत आहे. म्हणून आता बँकांच्या दारात टेबल, खुर्ची टाकून बसा, अधिकार्‍यांशी शिवसेनेच्या भाषेत बोला, एकही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या, कर्जमाफीच्या याद्या तपासा,चालूगिरी केल्यास आणि निकष लावून शेतकर्‍याला वंचित ठेवल्यास शिवसेना माफ करणार नाही, असा इशारादेखील ठाकरे यांनी यावेळी दिला.

नाशिकचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, धुळे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, हेमंत साळुंखे, राजू पाटील, महेश मिस्तरी, माजी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, भूपेंद्र लहामगे कैलास पाटील, वंदनाताई पाटील, हेमाताई हेमाडे, नितीन पाटील, मनिष जोशी, राजू टेलर, भरतसिंग राजपूत, कविता क्षिरसागर, छोटू पाटील, सुनील बैसाणे, बैसाणे, संजय गुजराथी, नंदुरबारचे यिक्रांत मोरे, दिपक गवते, आमशा पाडवी, जळगावचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, गुलाबराव वाघ, पंकज गोरे, संदीप गवळी, रामदास कानकाटे, कैलास मराठे, किरण कांबळे, किरण जोंधळे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. आदी मान्यवर उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*