मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाच्या कामाला ऑगस्टपासून प्रारंभ : ना.डॉ.भामरे

0
धुळे ।  प्रतिनिधी :  बहुप्रतिक्षित असलेल्या मनमाड – इंदूर रेल्वे मार्गाच्या कामाला ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होणार आहे़ पहिल्या टप्प्यात धुळे ते नरडाणा सेक्शनमध्ये शासकीय जागेवर पांझरा नदीवर एक मोठा पुल व इतर चार पुलांची निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषदेत दिली़

यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, विनोद मोराणकर, हिरामण गवळी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार झाल्यानंतर मी मनमाड- धुळे- इंदूर रेल्वे मार्गाचा विषय हाती घेण्याचे ठरविले. तेव्हा तत्कालीन रेल्वेमंत्री (सदानंद गौडा) यांना भेटलो. तेव्हा रेल्वे मार्गाची काहीही प्रगती झाली नसल्याचे आढळून आले. याबाबत मिस्टर खोटेंनी या रेल्वे मार्ग विषयी ज्या थापा मारल्या होत्या त्या उघडकीस आल्या.

मिस्टर खोटेंनी अनेक तारखा उद्घाटनाच्या दिलेल्या होत्या ते सगळे उघडकीस आल्यामुळे माझ्यावर सतत खोटे आरोप केले व कमरे खालची भाषा वापरली. प्रत्येक वेळा मी रेल्वेचे कागद पत्रे व पुरावे देऊन मिस्टर खोटेंना उघड पाडले आहे. यांच्याकडे मुद्दे नसले की ते अवांतर खोटे आरोप हा त्यांचा नित्याचा उद्योग झालेला असल्याची टीकाही डॉ. भामरे यांनी केली.

गेल्या आठवड्यातच ना.गडकरी, ना.पियुष गोयल यांच्या सोबत बैठक घेतली. त्या बैठकीत मनमाड- धुळे- इंदूर रेल्वे मार्गाचा आढावा घेण्यात आला व त्यात हा प्रकल्पाला गतीसाठी आदेश देण्यात आले व महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

मनमाड- धुळे- इंदूर रेल्वे मार्ग होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. हा रेल्वे मार्ग स्पेशल रेल्वे प्रोजेक्ट आहे. भुसंपादन होईलच. मात्र त्यासाठी काम थांबणार नाही. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रेल्वे मार्गाच्या कामाला प्रारंभ होईल. पहिल्या टप्प्यात धुळे ते नरडाणा सेक्शनमध्ये शासकीय जागेवर पांझरा नदीवर एक मोठा पुल व चार पुलांची निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार.

नोव्हेबर 2018 पासून भुसंपादनाच्या प्रक्रीयेला सुरूवात होईल. राज्य शासन भुसंपादन करेल व जेएनपीटीई पैसे देईल. चार ते पाच वर्षात रेल्वे मार्गाचे काम पुर्ण होईल. इतिहासात सर्वात वेगाने काम होणारा हा प्रकल्प असल्याचेही डॉ. भामरे यांनी सांगितले. विशेष म्हणजे डॉ. सुभाष भामरे यांनी रेल्वेमार्गाची ही सर्व कागदपत्रे व सविस्तर माहिती स्वतः पॉवरपाईंट प्रेझेंन्टेशनव्दारे सांगितली.

सत्य परेशान होता है, परजीत नही

डॉ़ भामरे यांनी पत्रकार परिषदेत आमदारांचे नाव न घेता म्हणाले की, काही मंडळी फक्त धुळ्यात आदळआपट करतात. हा केंद्राचा विषय आहे राज्याचा नाही, हेही त्यांना समजत नाही. त्यांना 20 वर्षात जमले नाही ते मी दोन ते तीन वर्षातच पाठपुरावा करून इथपर्यंत प्रकल्प आणाला. त्यामुळे खोटेंची जळफळात होत आहे.

पुरावे देवून त्यांना अनेक वेळेस उघडे पाडले. तरी ते पुन्हा-पुन्हा पत्रके काढतात. त्यांना उत्तर देण्यामध्ये मी माझा वेळ खर्च न करता विकास कामे करत राहणार आहे़ रेल्वे मार्गासाठी मुंबई आणि दिल्ली या ठिकाणाहून वेळोवेळी पाठपुरावा होत असतो़ पुराव्यांशिवाय मी बोलत नाही़ माझ्यावर होणार्‍या आरोपांकडे लक्ष दिल्यास विकास कधी करणार असा सवालही त्यांनी उपस्थित करत, सत्य परेशान होता है, पराजित नही, असे सांगितले. तसेच इतर विषयांचा नंतर समाचार घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

*