सोनगीरजवळ ट्रकचालकाला मारहाण

0
सोनगीर । दि.12 । वार्ताहर-सोनगीर – दोंडाईचा राज्यमार्गावर येथील सोनगीर फाट्याकडे येणार्‍या ट्रकच्या पुढे स्कॉर्पिओ उभी करुन चार इसमानी ट्रक कॅबीनमध्ये घुसून चालकास मारहाण केली. चालकाजवळील तीन हजार रुपये लुटून नेले. ही घटना आज (ता. 12) सकाळी दहाला भरदिवसा घडली.
अहमदाबाद येथून कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे धुण्याची पावडर व साबण घेऊन जाणारा ट्रक (क्रमांक एम एच 18, बीए 8167) सोंडले ओलांडून दोन किलोमीटर अंतरावरील सोनगीर फाट्याकडे येत असतांना मागुन येणार्‍या काळी स्कॉर्पिओ (क्रमांक एम एच 43 / 8849) ट्रकपुढे उभी राहिली. त्यामुळे चालकाला ट्रक थांबविणे भाग पडले.

स्कॉर्पिओमधून चार तरूण खाली उतरले. ट्रकचालक व सहचालकास मारहाण करून केबीनमध्ये घुसले. वाहनात काय आहे अशी विचारणा केली.

यावेळी संशयितांनी त्यांच्या खिशातील तीन हजार रुपये काढून घेतले. दोघांना ट्रकखाली उतरवून एका संशयितांने ट्रक चालवत सोनगीर फाट्यावरून शिरपूरकडे जात असताना सोनगीरपासून चार किलोमीटर अंतरापर्यंत नेऊन एका कडेला ट्रक उभा केला व एकाने कोणाशीतरी मोबाईलद्वारे संपर्क केला. गाडीत काय आहे, अशी विचारणा केली.

पुन्हा दोंडाईचाकडे दोन किलोमीटर अंतरावर ट्रक उभा केला. व ते चारही इसम गाडीने दोंडाईचा कडे निघून गेले. त्यानंतर तीन हजार रुपये व्यतिरिक्त अन्य काहीही चोरीस गेले नाही.

याप्रकरणी ट्रकचालक मच्छिंद्र तुकाराम शेजवळ (रा. पिंपळगाव बसवंत ता. निफाड) याने चारही संशयितांविरुध्द फिर्याद दाखल केला आहे.

अचानक व दिवसा घडलेल्या या घटनेने चालक शेजवळ व सहचालक भगवान हरीभाऊ लासुरे ( रा. नाशिक) हादरून गेले होते. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे तपास करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

*