आणखी तीन अधिकारी रडारवर

0
धुळे । दि.12 । प्रतिनिधी-पंचायतराज समितीचे सदस्य आ.हेमंत पाटील यांना दीड लाखाची लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी यांना 25 हजाराचा जामिन जिल्हा व सत्र न्यायाधिश गजभिये यांनी मंजूर केला.
दरम्यान, या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे चौकशी सुरु असून या चौकशीत आणखी तीन अधिकारी अटकण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याला एसीबीने दुजोरा दिला आहे.

जिल्ह्यात पाच ते सात जुलैदरम्यान पंचायतराज समिती जिल्हा दौर्‍यावर आली होती. या वेळी जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी यांनी समिती सदस्य आ.हेमंत पाटील यांना दीड लाखाची लाच देण्याचा प्रयत्न केला.

त्यांना लाचुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शहरातील हॉटेल झंकार पॅलेसमध्ये दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास रंगेहात पकडले.

त्यानंतर माळी यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने दि.12 जुलैपर्यंत पोलिस कोठडी माळी यांना सुनावली होती. आज कोठडीची मुदत संपल्याने एसीबीने त्यांना जिल्हा न्यायालयात जिल्हा व सत्र न्यायाधिश गजभिये यांच्या समोर उभे केले. तुषार माळी यांच्यातर्फे अ‍ॅड.नीलेश मेहता यांनी बाजू मांडली. न्यायालयाने 25 हजाराचा जामिन माळी यांना मंजूर केला.

चौकशी सुरुच – या प्रकरणाची कसून चौकशी एसीबीद्वारे सुरु आहे. समितीसाठी नेमलेल्या सर्व संपर्क अधिकार्‍यांचे जबाब घेण्यात आले असून त्यातील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार्‍यासह निरनिराळ्या खात्यांचे विभागप्रमुख, कनिष्ठ अधिकार्‍यांचे जबाब अजूनही घेतले जात आहेत. या चौकशीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर तीन अधिकारी असून त्यांचा या प्रकरणात समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या दृष्टिने चौकशी सुरु आहे.

 

LEAVE A REPLY

*