शेतकर्‍यांचा बैलगाडी प्रवास

0
धुळे । दि.12 । प्रतिनिधी-शेतकर्‍यांशी संवाद साधण्यासाठी धुळ्यात आलेले शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सभेसाठी जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधव बैलगाडीने दाखल झालेले होते.
त्याचप्रमाणे तरूण वर्ग मोठ्या संख्येने मोटार सायकल, रिक्षा रॅली काढून तसेच शिवसेनेचा आणि बाळासाहेब ठाकरे यांचा जयघोष करीत सभास्थळी दाखल झाला होता.
उध्दव ठाकरे येणार असल्यामुळे शहरातील विविध चौकात भगवे झेंडे लावण्यात आले असल्याने शहरातील संपुर्ण वातावरण भगवेमय झाले होते.

सभास्थानी बाळासाहेब ठाकरे, उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची छायाचित्रे असलेले मोठमोठे होर्डिंग लावण्यात आले होते. उपस्थितांसाठी टीव्हीचे पडदे लावण्यात आले होते. सभास्थळी उध्दव ठाकरे हे दुपारी 3.15 वाजता आले.

शेतकर्‍यांच्या मदतीसाठी दीड लाखाचा धनादेश धुळे शिवसेनेच्या वतीने उध्दव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करतांना शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी समवेत परिवहन मंत्री दिवार राऊते, हेमंत साळुंखे आदी.

त्यांची कार थेट शामियान्यापर्यंत आणण्यात आली. उध्दव ठाकरे यांनी व्यासपिठावर आल्याबरोबर हात उंच करुन शेतकर्‍यांना अभिवादन केले. कोणाचाही सत्कार न स्विकारता उध्दव ठाकरे यांनी सभेला सुरुवात केली.

अत्यंत साध्यासोप्या भाषेत त्यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधला. यावेळी सरकारच्या कर्जमाफीबाबत शेतकर्‍यांना प्रश्न विचारलेत. ठाकरेंची सभा सुरु असताना अनेकवेळा शेतकर्‍यांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

सभास्थळी प्रचंड पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला होता. डी झोनमध्ये कोणालाही परवानगी नव्हती. पोलिसांनी मानवी साखळी करुन डी झोन बंद केला होता.

उध्दव ठाकरे यांची सभा संपल्यानंतर शेतकर्‍यांच्या मदतीसाठी जिल्हा शिवसेनेतर्फे दिड लाखांचा धनादेश उध्दव ठाकरे यांना सुपूर्द आला. राष्ट्रगिताने सभेची सांगता करण्यात आली.

पोस्टर्सची ठाकरेंना आठवण- सभास्थळी उध्दव ठाकरे यांच्या सभेचे प्रचंड गर्दी असलेले एक भव्य पोस्टर लावण्यात आले होते. हे पोस्टर कोणत्या सभेचे आणि कोणत्या वर्षाचे आहे, याची उध्दव ठाकरेंनी उपस्थितांना आठवण करून दिली.

काही वर्षांपुर्वी शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीसाठी आपली धुळ्यात सभा झाली होती, त्यावेळीही मी शेतकर्‍यांशी संवाद साधायला आलो होतो. त्या सभेचे पोस्टर पाहून मला त्या सभेची आठवण झाली, असेही उध्दव ठाकरे म्हणाले.

प्रियंका जोशीचे मनोगत- उध्दव ठाकरे कार्यक्रम स्थळी येण्यापुर्वी प्रियंका जोशी या चिमूकलीने मनोगत व्यक्त केले. आपल्या मनोगतातून तिने शेतकर्‍यांच्या व्यथांवर प्रकाश टाकला. चिमुकलीच्या छोट्याशा भाषणाला उपस्थित शेतकर्‍यांनी दादा दिली.

 

 

 

 

LEAVE A REPLY

*