दोंडाईचा लायन्स क्लब अध्यक्षपदी किशोर जैन

0
दोंडाईचा । वि.प्र.-दोंडाईचा शहर लायन्स क्लब इंटरनॅशनल क्लबच्या अकराव्या अध्यक्षपदी प्रसिध्द उद्योजक किशोर जैन यांची निवड करण्यात आली.
लायन्स क्लब दोंडाईचा ची 2007 ला स्थापना झाली. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व पर्यावरण संवर्धन असे विविध कार्यक्रम राबवित आहे.
यात वृक्षदिंडी काढणे, वृक्षारोपण करणे, पिंजरे वाटप करणे, शवपेटी व अमर रथ लोकार्पण, दशक्रिया विधी ओटा बांधून देणे, मेडिकल कॅम्प घेणे, रक्तदान शिबीर आयोजित करणे, गणवेश वाटप करणे, पिस पोस्टर स्पर्धा घेणे, मॅरेथॉन स्पर्धा भरविणे, आनंद मेळावा आयोजित करणे. तसेच विविध विषयांवर मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करणे यांचा समावेश आहे.

अशा सदैव समाजपयोगी कार्य करणार्‍या लायन्स क्लब दोंडाईचाच्या अध्यक्षपदी ला. किशोर जैन सचिव-ला. चोईथ कुकरेजा तर कोषाध्यक्ष म्हणून ला.दिनेश वोरा यांची निवड झाली आहे.

यांच्या टीममध्ये-गौतम माखिजा, योगेश पाटील, .राकेश अग्रवाल, व्हीपी थर्ड एमजेएमहमजा जिनवाला, जॉईंट सेक्रेटरीप्रा.बी.बी.पाटील, अ‍ॅड.सेक्रेटरी ला.आशिष अग्रवाल, जॉइर्ंट ट्रेझरर एमजेएम ला.अनिल अग्रवाल, टेमरनंदू गुप्ता, टेलट्वीस्टर ला.सचिन अग्रवाल, सेंटेनियल चेअरपर्सन एमजेएम ला.कैलास जैन, मेंबर चेअरपर्सन एमजेएमसंजय दुग्गड, एलसीआयएम चेअरपर्सन, ब्रिजेश अग्रवाल, सर्व्हीस चेअरपर्सन एमजेएम हेमंत सोनार, मार्केटिंग चेअरपर्सन संजय अग्रवाल व लायन्स क्वेस्ट चेअरपर्सन ला.अभय कवाड यांचा समावेश आहे.

ला.किशोर जैन हे दोंडाईचाचे प्रसिद्ध उद्योगपती आहेत. ते केएस गृपच्या माध्यमातून जळगांव, शहादा, नंदुरबार व दोंडाईचा येथे कोल्डस्टोरेज चालवतात.

सोबतच दालमिल व बेसन मिल यांच्या उद्योगातही अग्रेसर आहेत. किशोर जैन हे लायन्स क्लब दोंडाईचाच्या स्थापनेपासून क्लबचे सदस्य आहेत.

तसेच हस्ती बँक दोंडाईचा शाखा सल्लागार समितीचे चेअरमन व हस्ती चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. गेल्या वर्षी त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे हस्ती चॅरिटेबल ट्रस्टला नॅशनल इंडस्ट्रीयल एक्सलेंस अ‍ॅवार्ड व क्वालिटी बँ्रड अ‍ॅवार्ड ही प्राप्त झाले आहेत.

तसेच क्लबचे सेक्रेटरी एमजेएमला.चोईथ कुकरेजा हे लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष व लायन्स डिस्ट्रीक्ट कॅबिनेटमध्ये-एन्व्हायर्मेंट डिस्ट्रीक्ट चेअरपर्सनही आहेत. तर कोषाध्यक्ष ला.दिनेश वोरा यांनी सुद्धा दोंडाईचा लायन्स क्लबचे अध्यक्षपद भुषविले आहे. तसेच ते लायन्स डिस्ट्रीक्ट कॅबिनेटमध्ये सदस्यही आहेत.

ला.किशोर जैन यांची लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हस्ती बँकेेचे प्रमुख आधारस्तंभ कांतीलालजी जैन व व्यवस्थापकीय संचालक प्रकाश कुचेरिया, जनरल मॅनेजर माधव बोधवाणी आणि हस्ती स्कूल सल्लागार समिती अध्यक्ष डॉ.विजय नामजोशी यांनी निवडीचे स्वागत केले.

 

LEAVE A REPLY

*