सरपंचाविरोधात अविश्वास ठराव

0
पिपंळनेर । दि.12 । वार्ताहर-मचमाळे-कुरुसवाडे ग्रुप ग्रामपंचायतीत आज सरपंच जिजाबाई वसंत गांगुर्डे यांच्या विरोधात 6 सदस्यांनी अविश्वास ठराव पारित केला. यावेळी सदर प्रक्रिया ही अपर तहसीलदार वाय.सी.सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत हा अविश्वास ठेराव पारित झाला.
सरपंचांचा मनमानी कारभार सदस्यांचे एकूण न घेणे सदस्यांना विश्वासात घेणे गेल्या 11 महिन्यात कोणतही काम केल नाही या विरोधातच गटनेते माजी सभापती टिकाराम बहिरम यांच्या 6 सदस्यांनी सरपंच जिजाबाई वसंत गांगुर्डे यांच्या विरोधात अविश्वास ठराव पारित केला.

सकाळी मचमाळे-कुरुसवाडे ग्रुप ग्रामपंचायतीत अपर तहसीलदार वाय.सी.सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत, 9 सदस्यांमधून 6 सदस्यांनी सरपंचा गांगुर्डे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडला यात सदस्य वसंत महारु बहिरम, सुनिल रामदास चौरे (उपसरपंच) सरला दिनेश ठाकरे यांनी अविश्वास ठराव मांडला, तर सरपंचा जिजाबाई वसंत गांगुर्डे यांच्या सोबत सदस्य शामराव भोया चौरे व राहुल देवीदास गावीत हे 3 सदस्य होते.

यावेळी 6 सदस्यांनी विरोध करत अविश्वास ठराव मांडल्याने अपर तहसीलदार वाय.सी.सूर्यवंशी यांनी तो पारित करत तो मंजुर करण्यात आल्याचे तहसीलदार सूर्यवंशी यांनी सांगितले.

यापुढे गावाच्या विकासासाठी कटीबद्द असून सर्वांना बरोबर घेवून विकास करु असे गटनेते माजी सभापती टिकाराम बहिरम यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*