अधिकार्‍यांनी पाण्याच्या स्त्रोतची खात्री करा

0

धुळे / शासनाकडून पाणीटंचाईबाबत लाखोंचा निधी देण्यात येतो.

मात्र अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे शासनाचा लाखोंचा निधी वाया जातो.

अधिकार्‍यांनी पाणीटंचाईबाबत संपुर्ण अभ्यास करुनच काम सुरु करावे. ज्या ठिकाणी पाण्याचा स्त्रोत असेल अशाच कामांना मंजूरी देवून कामे पुर्णत्वास करा अशा सूचना जि.प.चे, समाजकल्याण सभापती मधुकर गर्दे यांनी दिल्या.

जिल्ह्यातील काही गावांना पाणी टंचाई जाणवू लागली असून यासाठी शासनस्तरावरुन विविध उपाययोजना करण्यात येत आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील 25 गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात येत असल्याची माहिती स्थायीच्या बैठकीत देण्यात आली.

यावेळी जि.प.च्या बैठकीत शिक्षण, आरोग्य, समाज कल्याण, स्वच्छता, बांधकाम या विषयांवर चर्चा करण्यात आली.

जर अधिकार्‍यांनी जागेवर बसून अहवाल शासनस्तरावर पाठविला तर पुढील कारवाईस अधिकारी जबाबदार राहितील असे सांगितले.

LEAVE A REPLY

*