नेर येथील सार्वजनिक शौचालय काम निकृष्ठ दर्जाचे

0
धुळे । दि.12 । प्रतिनिधी-पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छता अभियानावर करोडो रुपये खर्च करत असून शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी स्वच्छ भारत अभियानातून वैयक्तिक अनुदान देण्यात येत मात्र या योजनेतून नेर येथे शौच्छालयाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
भारत शंभर टक्के हागणदारी मुक्त व्हावा यासाठी सरकार करून नागरिकांना प्रसार माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.

नागरिकांनी शौच्छालयाचा वापर करावा यासाठी शासनकडून करोडो रुपये खर्च केला जातो. मात्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या मोहिमेला काळे फासणारे काम तालुक्यातील नेर येथील ग्रामपंचायतीचे सरपंच शंकर खलाणे यांनी नेर येथे 7 लाख 50 हजार रुपये खर्च करून भावानगीर महाराज मंदिर येथे सार्वजनिक शौच्छालय बांधले आहे.

मात्र या शौच्छालयाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने या शौच्छालयाचा वापर परिसरातील नागरिकांनी एकही वेळा उपयोग केलेला नाही.

शौच्छालयाच्या टाकीमध्ये डुकरांचे पडून मृत्यू झाल्याची घटना सतत घडतात त्यामुळे या टाक्यांमधून परिसरामध्ये दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

त्यासाठी सार्वजनिक शौच्छालयाचा वापर नागरिकांसाठी न होता उलट गैरसोय झाली आहे. या टाक्यांमध्ये डुकरे मरण पावल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

त्यामुळे या योजनेची सखोल चौकशी करून येथील सरपंच शंकर खलाणे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांना सरपंच पदावरुन तत्काळ दूर करावे अशी मागणी नेर येथील ग्रामस्थांनी केली आहे

 

LEAVE A REPLY

*