सेंट्रींग काम करणार्‍याने मिळविले 100 टक्के गुण

0
शिरपूर । दि.11 । प्रतिनिधी-येथील आर. सी. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्रथम वर्ष विज्ञान वर्गात शिकणारा राहुल कैलास पाटील या विद्यार्थ्याने सी.जी.पी.ए.त 600 म्हणजेच तब्बल 100 टक्के गुण प्राप्त करुन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
राहुल पाटील हा धमाणे ता.शिंदखेडा येथून महाविद्यालयात दररोज नियमितपणे ये – जा करतो. त्याचे वडील हातमजुरी करतात. सुटीच्या दिवसात राहुल पाटील हा देखील स्वत: सेन्ट्रिंग काम करून आपल्या शिक्षणासाठी लागणार्‍या पैशांची स्वत: तजवीज करतो.

त्याच्या या यशाबद्दल तो महाविद्यालयात कौतुकाचा विषय ठरला आहे. कमवा व शिका या योजनेअंतर्गत महाविद्यालय त्याला त्याच्या शिक्षणासाठी हातभार लावणार आहे, असे प्राचार्य डॉ.डी.आर.पाटील याने सांगितले.

त्याच्या यशाबद्दल माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, संस्थेचे अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, चेअरमन राजगोपाल भंडारी, संचालक डॉ.के.बी.पाटील, सर्व संचालक, प्राचार्य डॉ. डी.आर.पाटील व विज्ञान शाखेतील सर्व शिक्षकांनी मंडळाने कौतुक केले.

 

LEAVE A REPLY

*