दिव्यांग योगिताला ‘जीवनसाथी’ बनवून ‘भरत’ने दिली आयुष्याची साथ !

0
राजेंद्र राणे,निजामपूर । दि.10 ।-दिव्यांगपण शरीराचे असते. ते कधी जन्मत: तर कधी अपघातातने येते. पण दिव्यांग व्यक्ती इतरांपेक्षा कोठेही कमी नसते.इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक क्षेत्रात दिव्यांग व्यक्तींनी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली आहे.
मात्र विवाहाचा विषय आला की, अनेक अडचणी निर्माण होताना दिसतात. दिव्यांगांची जिवनसाथी म्हणून निवड करतांना खूप विचार केला जातो.
मात्र असे असले तरी दिव्यांगांना जोडीदार म्हणून स्वीकारणारे भरत मोराणकर यांच्यासारखे आदर्श उभा करणारे तरूणही समाजात आहे.

साक्री तालुक्यातील छडवेल कोर्डे येथील एका दिव्यांग मुलीशी विवाह करून लामकानी येथील भरतने एक असाच आदर्श उभा केला आहे.

दिव्यांग मुला-मुलींना दैंनदिन जीवनात वावरतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बहुसंख्य दिव्यागांना दुसर्‍यावरच अवलंबून राहावे लागते.

काही दिव्यांग स्वत:च्या हिंमतीवर आपल्यातील कमतरतेकडे दुर्लक्ष करून सर्वसामान्यांपेक्षा कर्तृत्वान असल्याचे सिध्द करून दाखवितात.

असे दिव्यांग खरोखरच यशस्वी झाल्याचे पहावयास मिळते. शरीराने दिव्यांग असले तरी त्यांच्या मनाची इच्छा मोठी असते.

लाडशाखीय वाणी समाजातील छडवेलकोर्ड येथील व्यापारी संजय नरहर कोठावदे, दयानंद नरहर कोठावदे, विजय नरहर कोठावदे या तिन्ही भावंडाची योगिता ही एकमेव भगिनी.पायाने अपंग असल्याने त्यांनी तिच्या लग्नाचा विचार सोडला होता. त्यात वडिलांचे निधन झाले होते. आपल्या व्यापार-व्यवसायात तिन्ही भावंड गुंतलेले.

अशा परिस्थितीत निजामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते दगडू भटू पाटील (राणे) यांचा आणि तिघा भावंडांचा संपर्क झाला.

त्यातूनच दिव्यांग योेगिताच्या विवाहाची चर्चा चर्चा सुरू झाली. सुरूवातीला डी.बी.वाणी यांना कोठावदे बंधूंनी नकार दिला, मात्र डी.बी.वाणी यांनी वराचा शोध केला.

लामकानी येथील चंद्रकांत रामचंद्र मोराणकर यांचा मुलगा भरत चंद्रकात मोराणकर या युवकाला मुलगी दाखविण्यात आली.

भाजीपाला व्रिकीचा व्यवसाय करणार्‍या भरतने कुटूंबियांना मुलगी आवडल्याचे सांगुन लग्नास तयारी दर्शविली. भरतचे वडील चंद्रकांत मोराणकर यांनीही मुलाच्या निर्णयाचे कौतुक करून या विवाह सोहळ्यास मान्यता दिली.

त्यानंतर हा आदर्श विवाह सोहळा नंदूरबार येथील छत्रपती शिवाजी नाट्यगृहात थाटात पार पडला.

समाज बांधवांनी आदर्श घ्यावा – एका दिव्यांग मुलीशी विवाहबध्द होण्याचा निर्णय घेऊन भरत मोराणकर या तरूणाने इतरांसमोर मोठा आदर्श उभा केला आहे.

समाजातील इतर घटकांनीही यााचे आर्दश घ्यावा अशी अपेक्षा विवाहप्रसंगी दगडू भटू पाटील (निजामपूर) यांनी व्यक्त केली.

लामकानीच्या भरत मोराणकर या युवकांने दिव्यांग योगिताची जीवनसाथी म्हणून निवड केली ही खरोखरच अभिनंदनीय बाब आहे. या निर्णयाचे व विवाहाचे निजामपूर लाडशाखीय वाणी आणि समाजचैतन्य परिवाराने स्वागत केले आहे.

 

LEAVE A REPLY

*