अस्वच्छतेबाबत आयुक्तांना निवेदन

0
धुळे । दि.11 । प्रतिनिधी-महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे प्रभाग क्र. चार ते आठमध्ये स्वच्छता अभियानाचा बोजवारा उडाला असून कामात हलगर्जीपणा करणार्‍या अधिकारी, कर्मचारी व कचरा संकलन करणार्‍या ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे देवपूर पश्चिम मंडळ अध्यक्ष सागर चौधरी यांनी आयुक्तांकडे केली आहे.

अस्वच्छतेमुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यातून आजारांचा प्रसार-प्रचार होत आहे. शाळा, महाविद्यालयाजवळील लोखंडी कचराकुंड्यांची स्वच्छता होत नाही, झोपडपट्टीतील शौचालयांची स्थिती विदारक आहे. या शौचालयांमध्ये पाणी नाही, दरवाजे नाहीत.

हागणदारीमुक्त शहर ही वल्गना महापालिकेतर्फे केली जाते. मात्र, वास्तव वेगळे आहे. मुकादम, स्वच्छता निरीक्षक आरोग्याधिकारी व त्यांचे सहकारी यांची कचरा संकलन करणार्‍या ठेकेदाराशी छुपी भागिदारी आहे. याबाबत चौकशी करण्यात यावी अन्यथा कचरा फेको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

*