फागणेचा पाणीप्रश्न न सोडविल्यास रास्तारोको

0

फागणे / अनेकदा निवेदन देवून, प्रत्यक्ष भेट घेवून व चर्चा करुनही पाणी टंचाईच्या झळा सोसणार्‍या फागणेकरांकडे दुर्लक्ष करणार्‍या जिल्हा प्रशासनाबाबत ग्रामस्थ संतप्त आहेत.

येथील पाणी प्रश्न तातडीने न सोडविल्यास ग्रामस्थांसह रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनास दिला आहे.

फागणे येथील ग्रामस्थ यावर्षीही पाणी टंचाईच्या तीव्र झळा सोसत आहेत. येथील ग्रामस्थांना पावसाळ्यातही पुरेसे पाणी मिळत नाही.

आताही 15 ते 20 दिवसात फक्त एकदाच नळाद्वारे पाणी मिळत नाही. आताही 15 ते 20 दिवसात फक्त एकदाच नळाद्वारे पाणी मिळत आहे.

मात्र येथील पाणी टंचाईबाबत जिल्हा प्रशासन कसलीही दखल घेण्यास तयार नाही.

शासकीय व प्रशासकय पातळीवरुन येथील पाण्याच्या समस्येकडे गांभीर्याने पाहिले जात असल्यामुळेच दरवर्षी ग्रामस्थांना पाण्यासाठी हाल सोसावे लागत आहेत.

गेल्या वर्षीही फागणे गावाचा मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश करण्याची मागणी  केली होती. परंतू तीव्र पाणी टंचाई असतांनाही फागणे गावास या योजनेतून वगळण्यात आले.

 

LEAVE A REPLY

*