शेती खेडण्याच्या वादातून शेतकर्‍याला मारहाण

0
धुळे । दि.11 । प्रतिनिधी-शेत गट क्र.111 (1) अ ही शेती खेडण्याच्या वादातून शेतकर्‍याला मारहाण करुन जीवंत ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नऊ जणांविरुध्द सोनगीर पोलिस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, शेत गट क्र.111 (1) अ ही शेतजमिन ज्ञानेश्वर बच्छाव शिरसाठ (वय 44, रा.आंबेडकर चौक, सोनगीर) हे खेडत आहेत.
याचा राग येवून धर्मा हरचंद मोरेसह नऊ जणांना आला. त्यांनी ज्ञानेश्वर शिरसाठ यांना काठ्यांनी मारहाण करुन जखमी केले व शेतात पाय ठेवला तर जीवंत ठार मारु, अशी धमकी दिली.

ही घटना दि.10 जुलै रोजी सकाळी नऊ वाजता घडली. याप्रकरणी ज्ञानेश्वर बच्छाव शिरसाठ यांनी सोनगीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

भादंवि 143, 147, 148, 323, 324, 447, 504, 506 प्रमाणे धर्मा हरचंद मोरे, राहूल धर्मा मोरे, मुकेश निंबा बैसाणसह पाच ते सहा जण यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोना एस.आय.चव्हाण हे करीत आहेत.

विवाहितेचा छळ – पतीला अ‍ॅपेरिक्षा घेण्यासाठी माहेरुन एक लाख रुपये आणले नाहीत म्हणून विवाहितेचा छळ करुन हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांविरुध्द सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, धमाणे, ता.धुळे येथे राहणारी आशाबाई अंकुश भिल (वय 28) या विवाहितेने तिच्या माहेरुन तिच्या पतीसाठी अ‍ॅपेरिक्षा घेण्यासाठी एक लाख रुपये आणले नाहीत म्हणून तिचा छळ करुन तिला हाताबुक्क्यांनी मारहाण केली व ठार मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी सोनगीर पोलिस ठाण्यात आशाबाई अंकुश भिल यांनी फिर्याद दिली. भादंवि 498 (अ), 323, 504, 34 प्रमाणे विवाहितेचा पती अंकुश जगन भिल आणि जगन भटा भिल यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक उपनिरीक्षक एस.बी.जाधव हे करीत आहेत.

 

 

LEAVE A REPLY

*