कर्जमाफी मिळालेल्या शेतकर्‍यांची यादी जाहीर करा शिवसेनेचे ‘ढोल बजाओ’ आंदोलन

0
 धुळे । दि.10 । प्रतिनिधी-राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत किती शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे त्याची यादी जाहीर करा, या मागणीसाठी आज धुळे जिल्हा शिवसेनेतर्फे धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.
राज्य शासनाने शेतकर्‍यांसाठी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. शेतकर्‍यांना दिल्या गेलेल्या 34 हजार कोटींच्या कर्जमाफीचे प्रत्यक्ष लाभार्थी किती व किती शेतकर्‍यांचे सातबारे कोरे झाले आहेत हे मात्र कळत नाही.
यामुळे शेतकरी संभ्रमात पडले आहेत. कर्जमाफी मिळालेल्या शेतकर्‍यांची यादी जाहीर करा, यासाठी आज जिल्हा बँकेसमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.

आज सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर शिवसेना उपनेते अनंत दरे, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिकांनी ढोल वाजवित आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धिरज चौधरी यांना निवेदन देण्यात आले.

आपल्या बँकेतून किती शेतकर्‍यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे याची यादी प्रसिध्द करा, अशी दोन ओळीची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

या आंदोलनात महिला आघाडीच्या सहसंपर्क प्रमुख डॉ.माधुरी बोरसे, लोकसभा संघटक भगवान करनकाळ, महेश मिस्तरी, महानगरप्रमुख सतीष महाले, उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील, संजय गुजराथी, गंगाधर माळी, अतुल माळी, राजेंद्र पाटील, भूपेंद्र लहामगे, मनिष जोशी, नितीन पाटील,सुनील बैसाणे, संदीप सूर्यवंशी आदींसह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते.

 

 

LEAVE A REPLY

*