जि.प., पं.स. अधिकार्‍यांचे जबाब एसीबीने घेतले !

0
धुळे । दि.10 । प्रतिनिधी-पंचायत राज समितीतील सदस्य आ. हेमंत पाटील यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज जि.प. व पं.स.च्या अधिकार्‍यांचे जबाब नोंदविले.
पंचायत राज समिती जिल्हा दौर्‍यावर आली होती. त्यावेळी समितीतील सदस्य आ.हेमंत पाटील यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी यांनी दीड लाखाची लाच देण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी माळी यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. त्यानंतर माळी यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने दि. 12 जुलैपर्यंत माळी यांना पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागातर्फे तुषार माळी यांची चौकशी सुरु आहे. याच प्रकरणी आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जि.प.व पं.स.च्या दहा ते बारा अधिकार्‍यांचे जबाब नोंदविली.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे नासिक येथील पोलिस अधिक्षक पंजाबराव उगले हे गुन्हा दाखल झाल्यापासून धुळे कार्यालयात तळ ठोकून आहेत.

त्यांनी या गुन्ह्या संदर्भातील कागदपत्रांची तपासणी करुन अन्य माहितीही घेतली आहे.

आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागातर्फे कापडणे येथील पाणी योजना संदर्भातही चौकशी करण्यात आली. पोलिस निरीक्षक पवन देसले, पोलिस नाईक कैलास शिरसाठ, कृष्णकांत वाडीले, पोकॉ संतोष हिरे, प्रदीप देवरे, वाय.एम.केदार यांच्या पथकाने ही चौकशी केली.

 

LEAVE A REPLY

*