शिंदखेडा तालुक्यात शिवसेनेचे ढोल बजाओ आंदोलन

0
  धुळे । दि.10 । प्रतिनिधी-शेतकर्‍यांची कर्जमाफी फसवी आहे. शेतकरी कर्जमुक्तीचा आकडा खोटा असून बँकांनी शेतकरी कर्जमुक्तीची यादी बँकेच्या दरवाजावर लावावी यासाठी शिवसेना शिंदखेडा विधानसभा मतदार संघातर्फे ढोल बजाओ आंदोलन शिंदखेडा, दोंडाईचा, नरडाणा, मालपूर, चिमठाणे येथे करण्यात आले.
 यावेळी जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे, तालुका प्रमुख विश्वनाथ पाटील, विधानसभा संघटक छोटू पाटील, युवा सेनेचे गिरीष देसले, उपजिल्हा संघटक भाईदास पाटील, तालुका संघटक शानाभाऊ धनगर, मनोज पाटील, नंदकिशोर पाटील, संतोष देसले, वामन देसले, मंगेश पवार यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी शिवसेनेने निवेदन सादर केले.

शासनाने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना 2017 जाहीर करून शेतकर्‍यांना कर्जमाफी जाहीर केली. परंतु आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे या भावनेतून संपूर्ण महाराष्ट्रात मी कर्जमुक्त होणारच! हे अभियान राबविले व शिवसैनिकांनी जागो-जागी आंदोलने केली. त्याचाच परिणाम म्हणून शासनाला कर्जमाफी जाहीर करावी लागली.

परंतु शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून मुख्यमंत्र्यांनी चाळीस लाख शेतकर्‍यांचा सातबारा उतारा कोरा होणार व नव्वद लाख शेतकर्‍यांना अंशत: फायदा मिळणार असे म्हटले.

परंतु सदरची घोषणा फसवी असून शासनाने दिलेली आकडेवारी फसवी आहे. शेतकर्‍यांची कर्जमाफीचे आकडे जाहीर केलेले आहेत त्या कर्जमुक्त शेतकरी व अंशत: लाभधारक शेतकर्‍यांची यादी जाहीर करावी.

परंतु शासनाने शेतकरी कर्जमुक्ती साठी दिलेल्या जाचक अटी पाहता शासनाने जाहीर केलेली आकडेवारी फसवी आहे. शासन खोटी आकडेवारी सादर करीत आहेत.

मुंबईत शेती नसतांना देखील मुंबईतील 813 शेतकरी कर्जमुक्तीच्या यादीत आहे. ही सगळी आकडेवारी ढोबळ असून यात शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. असे निवेदनात म्हटले आहे.

 

LEAVE A REPLY

*