मार्चअखेर सोनगीरचा पाणीप्रश्न सोडविणार – आ.कुणाल पाटील

0
सोनगीर । वार्ताहर-येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी तापी नदीतून जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा व्यवस्था करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत.
त्यासाठी सुमारे 20 कोटी रुपये खर्च आवश्यक आहे. शासन एवढा पैसा लागलीच देणार नाही. त्यासाठी विशेष व वेगळे प्रयत्न करावे लागतील.
म्हणून पुढील आठवड्यात येथील ग्रामस्थांसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे व वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेण्यात येणार आहे, असे आ. पाटील यांनी सांगितले. मार्च पर्यंत सोनगीरचा पाणीप्रश्न नक्की सुटेल असे त्यांनी सांगितले.

येथील बसथांबालगत उघड्यावर मासेविक्री केली जाते. त्यांच्यासाठी महामार्गाजवळच व्यापारी संकुल बांधण्यात यावे अशी मागणी झाली. तेव्हा लवकरच निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.

येथे मुंबई – आग्रा महामार्ग व सोनगीर – खेतिया राज्यमार्गावर वेगवेगळ्या बसथांबाऐवजी एकच व सर्व सोयीयुक्त बसस्थानक असावे अशी मागणी 35 वर्षापासून आहे.

त्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच समस्या निकाली निघेल. तसेच उद्योग उभारणी करुन बेरोजगारांची संख्या कमी करण्यात येईल.

व्यायामशाळेचे काम पूर्णत्वास आले आहे. अजून काही विकासकामे लवकरच सुरू होणार आहेत असे ही आ. पाटील यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*