पोलीस अधीक्षक व जिल्हा बालसंरक्षण कार्यालयातर्फे ‘ऑपरेशन मुस्कान’ अभियान

0
धुळे । दि.10 । प्रतिनिधी-शहरासह जिल्ह्यामधील विविध भागात हरवलेल्या बालक तसेच बालकामगारांचा शोध घेण्यासाठी पोलिस प्रशासनातर्फे जिल्हा बालसंरक्षण कार्यालय, बालकल्याण समिती व इतर बालगृहे यांच्या मदतीने पुन्हा ऑपरेशन मुस्कान अभियान राबविण्यात येत आहे.
ऑपरेशन मुस्कान अंतर्गत 0 ते 18 वयोगटातील यात्रेत प्रवासादरम्यान अनेकवेळा लहान मुले हरवतात तर काही मुले शुल्लक कारणावरुन घरातून निघून जातात.
त्यांचा शोध घेणे अवघड होते. हरवलेल्या मुलांना सुखरुप शोधणे व आई-वडिलांच्या ताब्यात देणे हा ऑपरेशन मुस्कानचा मुख्य उद्देश असून त्यामुळे बेपत्ता मुलांना शोधणे आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी गृहखात्याच्या आदेशानुसार जिल्ह्यात चार वर्षापासून टप्प्याटप्प्याने ऑपरेशन मुस्कान राबविण्यात येत आहे.

आता पुन्हा एक वर्षानंतर हे अभियान हाती घेण्यात आले असून 1 जुलैपासून या मोहिमेस जिल्ह्यात प्रारंभ करण्यात येत आहे.

ऑपरेशन मुस्कानमधून विविध संस्था, सार्वजनिक ठिकाणे, हॉटेल, दुकाने, धार्मिक ठिकाणे, रेल्वेस्थानक आदी ठिकाणची व भिक मागणार्‍या मुलांची चौकशी करण्यात येईल.

जिल्हा पोलिस अधीक्षक एम.रामकुमार व जिल्हा बालसंरक्षण अधिकारी रत्ना वानखेडकर यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे जिल्ह्यात 1 ते 30 जुलैदरम्यान हरवलेल्या मुलांना शोधण्यासाठी ऑपरेशन मुस्कान राबविण्यात येत आहे.

 

LEAVE A REPLY

*