धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेला राष्ट्रीय ‘बेस्ट डाटा सिक्युरिटी’ पुरस्कार

0

धुळे ।  प्रतिनिधी :  धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेला राष्ट्रीय स्तरावरील सन 2017 चा ‘बेस्ट डाटा सिक्युरिटी’ पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दि.17 एप्रिल 2016 रोजी आग लागली होती. या आगीत बँकेचे संपूर्ण प्रशासकीय कार्यालय, त्यातील रेकॉर्ड व संगणकीय साहित्य जळून खाक झाले होते. परंतु बँकेने त्यापुर्वीच सर्व ग्राहकांचा डाटा व बँकेचा डाटा नाशिक येथील इएसडीएस या कंपनीकडील डिझास्टर रिकव्हरी सेंटर सन 2014 पासून भाडे तत्वावर घेवून तेथे सुरक्षित ठेवला होता.

त्याचप्रमाणे बँकेने नियमीत डीआर, ड्रील, डाटा सेंटर तपासणी यासारख्या तपासणीचे अत्याधुनिक टुल्स वापरल्याने सर्व ग्राहकांचे सर्व प्रकारचे व्यवहार आगीच्या घटनेच्या दुसर्‍याच दिवशी सुरळीत सुरु करण्यात आले होते. त्यात कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही व नवीन डाटा सेंटर उभारणी पर्यंत तीन महिन्याच्या कालावधी दरम्यान बँकेने डिझास्टर रिकव्हरी सेंटर यांच्यामार्फत बँकींग सेवा देण्याचे कामकाज सुरु ठेवले होते.

या सर्व बाबींची दखल राष्ट्रीय स्तरावरील बँकींग फ्रंटीयर या अग्रगण्य संस्थेने घेवून धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेला सन 2017 चा ‘बेस्ट डाटा सिक्युरिटी’ पुरस्कार देवून गौरविले आहे.

राष्ट्रीय स्तरावर संपूर्ण भारतातील डीसीसीबी झेत्रात महाराष्ट्रात एकूण सहा पुरस्कार देण्यात आले. त्यामध्ये धुळे जिल्हा बँकेचा समावेश आहे.

नवीदिल्ली येथे नाबार्डचे सीजीएम  सी.रामचंद्रन, रिझर्व बँकेचे (रिटायर्ड) गव्हर्नर आर.गांधी, सहकार भारतीचे सतीष मराठे यांच्या उपस्थितीत जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी धिरज चौधरी, सरव्यवस्थापक विजय सावंत व आयटी कक्ष प्रमुख संजय काटे यांनी सदर पुरस्कार स्वीकारला.

LEAVE A REPLY

*